रिक्षा चालकाने केला 5 वर्षीय मुलीवर बलात्कार, रक्ताने माखलेल्या पीडितेवर रुग्णालयात उपचार

रिक्षा चालकाने केला 5 वर्षीय मुलीवर बलात्कार, रक्ताने माखलेल्या पीडितेवर रुग्णालयात उपचार

पीडित मुलीला रक्ताने माखलेल्या अवस्थेत दरभंगा मेडिकल कॉलेज रुग्णालयात (डीएमसीएच) दाखल केलं गेलं.

  • Share this:

दरभंगा(बिहार), 07 डिसेंबर : महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अद्यापही सुटला नाही आहे. काहीही झालं तरी बलात्काराच्या घटना थांबत नाहीत. ताजी घटना बिहारमधील दरभंगाची आहे जिथे एका रिक्षा चालकाने 5 वर्षाच्या मुलीची हत्या केली आहे. पीडित मुलीला रक्ताने माखलेल्या अवस्थेत दरभंगा मेडिकल कॉलेज रुग्णालयात (डीएमसीएच) दाखल केलं गेलं. येथे चिमुकलीचे ऑपरेशन करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य पाहून डीएसपी अनोज कुमार यांच्यासह अनेक पोलिस ठाण्यातील पोलिसही पीडिताला पाहण्यासाठी दरभंगा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल झाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना कुमार यांनी घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, मुलीला रिक्षा चालकाने फसवून काही अंतरावर बागेत तिच्यावर बलात्कार केला.

इतर बातम्या - धक्कादायक! 3 वर्षाच्या चिमुकलीवर तरुणाने केला बलात्कार, आरोपी ताब्यात

पीडितेच्या कुटूंबाच्या म्हणण्यानुसार, ती घराबाहेर एका छोट्या मुलाबरोबर खेळत होती, त्यावेळी आरोपी तेथे आला व त्यांना फूस लावून दोन मुलींना त्याच्या ऑटोमध्ये बसवून तेथून निघून गेला. या दरम्यान त्याने निर्जन भागात एका बागेक मुलीवर बलात्कार केला. दरम्यान, मुलगी घराजवळ न सापडल्यानंतर घराच्यांनी तिचा शोध सुरू केला, तेव्हा ती एका ऑटोमध्ये गेल्याची माहिती समोर आली.

यानंतर कुटुंबियांनी परिसरात मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर, मुलीच्या वडिलांनी रस्त्यावर एक बेबंद अवस्थेत ऑटो उभी असल्याचे पाहिले. त्यातून मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता. मोबाईलची लाईट लावून तो रिक्षाजवळ गेला तेव्हा आरोपी फरार झाला आणि त्याने मुलीला रिक्षातून ताब्यात घेतलं.

हैदराबाद प्रकरण: आरोपींना ताब्यात घेण्याआधीच 'या' कारणामुळे पोलिसांनी केला होता एन्काऊंटरचा प्लान

पीडित मुलाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही मुले शेजारी-शेजारी बसलेल्या मिळाल्या. काही क्षणांचा विलंब झाला असता तर आरोपीने मुलींचा जीव घेतला असता. तर आरोपी ऑटो चालकाच्या हातात चाकू दिसल्याचेही सांगण्यात आलं आहे. भगवानपूर येथील रहिवासी तेतर साहनी असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी गरीब कुटुंबातील असून तिचे वडील मजूरीचं काम करतात.

First published: December 7, 2019, 11:27 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading