भोपाळमध्ये अंगाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद

भोपाळमध्ये अंगाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद

या घटनेच्या सीसीटीव्हीच्या व्हिडीओत काही महिला आणि लहान मुलं रस्त्याने चालत असल्याचे दिसतात. मात्र समोरून येणाऱ्या एका चारचाकी गाडीच्या चालकाचा ताबा गाडीवरून सुटतो आणि ती गाडी थेट रस्त्यावरून चालत असलेल्या महिलांना येऊन आदळते.

  • Share this:

भोपाळ,16 ऑक्टोबर: भोपाळमध्ये एका भरधाव गाडीने काही लोकांना उडवल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

या घटनेच्या सीसीटीव्हीच्या व्हिडीओत काही महिला आणि लहान मुलं रस्त्याने चालत असल्याचे दिसतात. मात्र समोरून येणाऱ्या एका चारचाकी गाडीच्या चालकाचा ताबा गाडीवरून सुटतो आणि ती गाडी थेट रस्त्यावरून चालत असलेल्या महिलांना येऊन आदळते. या अपघातात 2 महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तर एक लहान मुलगा देखील जखमी झाला आहे.या घटनेसंदर्भात भोपाळमधील तालिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून.अपघातनंतर गाडी चालक घटनेवरून पसार होताना या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं आहे. सध्या तरी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

First published: October 16, 2017, 5:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading