मराठी बातम्या /बातम्या /देश /

Dandi March: आजच्या दिवशीच झाली होती ऐतिहासिक दांडी यात्रेला सुरुवात, स्वातंत्र्यांच्या दिशेने भारताचं मोठं पाऊल

Dandi March: आजच्या दिवशीच झाली होती ऐतिहासिक दांडी यात्रेला सुरुवात, स्वातंत्र्यांच्या दिशेने भारताचं मोठं पाऊल

12 मार्च 1930 ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीची (Indian Freedom Movement) एक महत्त्वपूर्ण सुरुवात मानली जाते ज्यात महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) दांडी मार्च (Dandi March) सुरू केला आणि नागरी अवज्ञा चळवळीचा पाया घातला.

12 मार्च 1930 ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीची (Indian Freedom Movement) एक महत्त्वपूर्ण सुरुवात मानली जाते ज्यात महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) दांडी मार्च (Dandi March) सुरू केला आणि नागरी अवज्ञा चळवळीचा पाया घातला.

12 मार्च 1930 ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीची (Indian Freedom Movement) एक महत्त्वपूर्ण सुरुवात मानली जाते ज्यात महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) दांडी मार्च (Dandi March) सुरू केला आणि नागरी अवज्ञा चळवळीचा पाया घातला.

नवी दिल्ली, 12 मार्च: 12मार्च (12 March)ही भारताच्या स्वातंत्र चळवळीच्या (National Independence Movement) इतिहासातील खूपच महत्वाची तारीख मानली जाते. आजच्या दिवशीच राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi)यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी दांडी यात्रेची (Dandi March)सुरुवात केली होती. अहमदाबादच्या साबरमती आश्रमातून (Sabarmati Ashram) सुरू झालेल्या या यात्रेचा उद्देश म्हणजे ब्रिटिशांनी लागू केलेला मिठाचा कायदा मोडून काढणं हा होता. ही यात्रा ब्रिटीशांविरुद्ध निषेधाचं प्रतीक ठरली.

एक सुनियोजित आंदोलन -

ब्रिटिशांनी तयार केलेल्या अन्याकारक मिठावर कर लावणाऱ्या कायद्यालाच महात्मा गांधी यांनी त्यांच्या विरोधासाठीचे शस्त्र बनवलं होतं. त्यावेळी दांडी यात्रेची पूर्णपणे योजना तयार करण्यात आली होती. यामध्ये काँग्रेसच्या सर्वनेत्यांची भूमिका निश्चित करण्यात आली होती. ब्रिटिशांनी अटक केल्यानंतर कोणते नेते दांडी यात्रा सांभाळतील हे देखील निश्चित करण्यात आलं होतं.दांडी यात्रेला मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळाला. दांडी यात्रा जशीपुढे सरकत गेली तसं मोठ्या संख्येने लोकं त्यामध्ये सहभागी होत गेले.

रोज16किलोमीटर चालायचे गांधीजी -

ब्रिटिशांच्या मिठाच्या कायद्याला विरोध करण्यासाठी महात्मा गांधी यांनी आपल्या 79 सहकाऱ्यांसोबत 240 मैल म्हणजे 386 किलोमीटर लांबचा प्रवास करुन नवसारी जिल्ह्यातील छोटेसे गाव दांडीमध्ये पोहचले. जिथे त्यांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊन हाताने मिठागरातील मीठ हाताने उचलून सार्वजनिक रुपाने मिठाचा कायदा मोडला. 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रेला सुरुवात झाली होती, तर 6 एप्रिल 1930 ला ही यात्रा संपली. 25 दिवस चाललेल्या या यात्रेमध्ये महात्मा गांधी रोज 16 किलोमीटर चालायचे.

जनतेने गांधीजींना दिला होता पूर्णपणे पाठिंबा -

12 मार्च 1930 चा दिवस भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हा तो काळ होता जेव्हा काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसने ‘संपूर्ण स्वातंत्र्याची’ प्रतिज्ञा केली होती. यापूर्वी 1920 मध्ये गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात चौरी चौरामध्ये आंदोलकांनी पोलीच चौकी जाळली होती त्यामुळे गांधीजींनी ते आंदोलन मध्येच स्थगित केले होते. त्यानंतरचे दांडी यात्रा हे सर्वात मोठे जन आंदोलन होते ज्यामध्ये जनतेने महात्मा गांधींना मोठा पाठिंबा दिला होता आणि हे आंदोलन पूर्णपणे अहिंसक राहून यशस्वी झाले.

अहिंसाने तोडला ब्रिटीश राजवटीचा अहंकार -

दांडीयात्रा संपल्यानंतर सुरु असलेल्या असहकार आंदोलना दरम्यान मोठ्या संख्येनेआंदोलकांना अटक करण्यात आली. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आली होती. मात्र आंदोलनकर्त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी कोणत्याही प्रकारे हिंसाचाराचा अवलंब केला नाही. अमेरिकेचे पत्रकार वेब मिलर यांनी ब्रिटीशांनी सत्याग्रहींवर केलेल्या अत्याचाराच्या कथा जगासमोर मांडल्या. त्यामुळे जगासमोर ब्रिटिश साम्राजाचा मोठा अपमान झाला.

भारतीय स्वातंत्र्याचा पाया -

या आंदोलनाचा अंत गांधी- आयर्विन कराराने झाला. यानंतर ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचार करण्यास सुरुवात केली. 1935 च्या कायद्यामध्ये याची झलक पहायला मिळाली. त्यानंतर 1942 ला गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाला सुरुवात केली.

(हे वाचा-  'त्यांनी मला चपलेनं मारलं आणि... ', Zomato बॉयचा अटकेनंतर धक्कादायक खुलासा!)

महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक दांडी यात्रेला या वर्षी 91 वर्षे पूर्ण होत आहेत. तसंच भारताला स्वातंत्र्य मिळाल्याला 75 वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे हा क्षण आणखीन खास झाला आहे. याच कारणास्तव भारत सरकारकडून स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने 75 आठवडे आधी 12 मार्चला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करायला सुरुवात केली जात आहे.

First published:

Tags: India, Mahatma gandhi, Research