संतापजनक! बर्थडेला तरुणाची 'बदमाश पार्टी', 266 डान्सर्स महिलांना जबरदस्ती नाचवलं

बर्थडे पार्टीवेळी एका तरुणाने चक्क 266 तरुणींना जबरदस्ती नाचवलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे या प्रकारावर राग व्यक्त करण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 04:34 PM IST

संतापजनक! बर्थडेला तरुणाची 'बदमाश पार्टी', 266 डान्सर्स महिलांना जबरदस्ती नाचवलं

बंगळूरू, 17 जून : हल्लीच्या तरुणांचं बर्थडे म्हणटलं की तुफान सेलिब्रेशन असतं. केक अंगावर फासण्यापासून ते मोठ्या पार्ट्या बर्थडेसाठी आयोजित केल्या जातात. काही वेळा अशा पार्ट्यांमधून मोठे वाद झाल्याच्या अनेक बातम्याही तुम्ही पाहिल्या असतील. पण बर्थडेच्या नादात एका तरुणाची भलतीच गुंडगिरी समोर आली आहे.

बंगळुरूच्या एका तरुणाने असा काही धक्कादायक प्रकार केला की त्याने पोलिससुद्धा थक्क झाले आहेत. बर्थडे पार्टीवेळी एका तरुणाने चक्क 266 तरुणींना जबरदस्ती नाचवलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे या प्रकारावर राग व्यक्त करण्यात येत आहे. खरंतर, या बदमाश तरुणाचा 34वा बर्थडे होता. त्यासाठी त्याने जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये दारुच्या     नशेत तरुणाने महिलांना नाचण्याची जबरदस्ती केली. ही पार्टी शहरातल्या मोठ्या डान्स बारमध्ये आयोजित करण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तरुणाच्या तावडीत सापडलेल्या महिलांना सोडवलं. कुनिगल गिरी असं या बदमाश तरुणाचं नाव आहे. कुनिगलविरोधात आधीपासूनच अपहरण, लूट, धमकी, मारहाण आणि जमिनीचे वाद अशा 80 गुन्ह्यांची नोंद आहे. बर्थडेच्या या पार्टीमध्ये कुनिगलने शहरातल्या नामांकित गुंडांनाही बोलावलं होतं.

'हॅप्पी बर्थडी गिरी सर' असं बोर्डावर लिहण्यात आलं होतं...

या पार्टीमध्ये डान्स बारमधील महिलांना नाचण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. त्यावेळी त्यांच्यासोबत अश्लिल प्रकार करण्यात आल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. पार्टीमध्ये जेव्हा मोठा गोंधळ झाला तेव्हा पोलिसांना प्राचारण करण्यात आलं. तेव्हा बारमझ्ये बोर्डावर 'हॅप्पी बर्थडी गिरी सर' असं लिहण्या आलं होतं तर महिलांवर पैसेही उधळण्यात येत होते.

Loading...

पोलिसांना पाहिल्यानंतर कुनिगल गिरी तिथून पळून गेला असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. तीन माळ्यांचा हा बार आहे. त्याच्या हॉलमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण पोलिसांनी छापेमारी करताच गिरीने त्याच्या साथीदारांसोबत पळ काढला. पण अधिक तपासानंतर पोलिसांनी गिरी आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतलं असून त्यासंदर्भात आता अधित तपास सुरू आहे.

VIDEO: झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला टोळक्याकडून बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 04:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...