दुर्देवी! साध्या तापाला समजला कोरोना, पत्नी-मुलांच्या बचावासाठी उचलंल टोकाचं पाऊल

दुर्देवी! साध्या तापाला समजला कोरोना, पत्नी-मुलांच्या बचावासाठी उचलंल टोकाचं पाऊल

पत्नीचा आवाज ऐकल्यानंतर शेजारच्यांनी येऊन घराचा दरवाजा उघडला. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता

  • Share this:

हैदराबाद, 12 फेब्रुवारी : चीनच्या वुहानमधून जगभरात पसरणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतात केवळ तीन प्रकरणे दिसून आली आहेत. परंतु व्हायरसच्या संसर्गाबद्दल लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. मंगळवारी आंध्रप्रदेशात एका 50 वर्षीय व्यक्तीने कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या संशयावरून गळफास लावून घेतला. पत्नी आणि मुलाला संसर्गापासून वाचवण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्यक्ती चित्तूर येथील रहिवासी असून बाला कृष्णाहद असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कृष्णाच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, विषाणूजन्य तापाची लागण झाल्यानंतर त्यांनी इंटरनेटवर कोरोना व्हायरस संबंधित व्हिडिओ पाहिले होते. यानंतर त्यांना असे वाटू लागले की त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी कृष्णाने घरातील सदस्यांना घरातच कोंडून ठेवले आणि त्यांच्या आईच्या थडग्यावर निघून गेले.

डॉक्टरांना कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत

यानंतर कृष्णांची पत्नी लक्ष्मी देवी आणि कुटुंबातील सदस्य आरडाओरडा करीत होते. कृष्णा य़ांनी त्यांना घरात कोंडून ठेवले होते. कृष्णा यांच्या पत्नीचा आवाज ऐकल्यानंतर शेजारच्यांनी येऊन घराचा दरवाजा उघडला. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. लक्ष्मीदेवी आणि कुटुंबातील इतर सदस्य कृष्णाच्या आईच्या थडग्याच्या दिशेने धावत होते. मात्र ते पोहोचण्यापूर्वी कृष्णा यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. तिरुपतीच्या डॉक्टरांनी मृत कृष्णाची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. डॉक्टरांनी सांगितले की, त्याला सामान्य व्हायरल तापाचा आजार होता. मी तुम्हाला सांगतो की आंध्र प्रदेशात कोरोना व्हायरसचे एकही प्रकरण समोर आलेले नाही.

काय आहेत लक्षणं

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास होणे, तत्सम लक्षण दिसून येत आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. मात्र नेहमीपेक्षा काही वेगळी वा तीव्र लक्षणे दिसून येत असल्यास तातड़ीने आपल्या जवळील सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधा.

First published: February 12, 2020, 10:26 AM IST

ताज्या बातम्या