भारतात एका कैद्यासाठी तुरुंग, 24 तास अधिकारी तैनात!

त्या कैद्याला दिवसातून 2 तास मोकळ्या हवेत फिरण्याची परवानगी आहे. याशिवाय त्याच्या सेलमध्ये टीव्ही असून जवळच्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवण्यात येतं.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 02:38 PM IST

भारतात एका कैद्यासाठी तुरुंग, 24 तास अधिकारी तैनात!

एक असा तुरुंग जिथं फक्त एकच कैदी आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. असा एक तुरुंग भारतात असून त्यात असलेला कैदीही कोणी विशेष किंवा व्हीआयपी नाही. या कैद्यासाठी तिथे गार्डसह अनेक अधिकारी तैनात आहेत. त्याच्यासाठी जेवण आणि इतर गोष्टी जवळच्या रेस्टॉरंटमधून येतात.

भारताचा केंद्रशासित प्रदेश दीव दमणच्या बेटावर एक तुरुंग आहे. बेटावरील प्रसिद्ध किल्ला दिउ इथं हा तुरुंग आहे. पोर्तुगाल शासकांनी या किल्ल्याची बांधणी केली होती.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार या किल्ल्यातील तुरुंगाचे बांधकाम 472 वर्ष जुनं आहे. भारतीय पुरातत्व खातं या ठिकाणाल पर्यटनस्थळ कऱण्याच्या तयारीत आहे. आताही इथं पर्यटक येतात पण त्यांना कंपाउंडपर्यंत येण्याची परवानगी आहे.

Loading...

इथल्या तुरुंगात असलेल्या एकमेव कैद्याचे नाव दीपक कंजी आहे. त्याने पत्नीला विष देऊन मारले होते. या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू असून जोपर्यंत कोर्ट निर्णय देणार नाही तोपर्यंत त्याला तुरुंगातच ठेवण्यात येणार आहे.

तुरुंगातील एका कैदासाठी या ठिकाणी 5 अधिकारी आहेत. त्याला जवळच्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवले जाते. दिवसातून 2 तास मोकळ्या हवेत फिरण्याची त्याला परवानगी आहे.

कैद्याला ठेवण्यात आलेला सेल 50 मीटर वर्ग आहे. यात टीव्ही असून त्यावर दूरदर्शन आणि इतर चॅनेल आहेत. या ठिकाणी 20 कैद्यांना ठेवता येईल एवढी जागा आहे.

तुरुंगात तैनात अधिकाऱी शिफ्टमध्ये काम करून 24 तास पहारा देतात. या जेलमध्ये एकूण 60 कैदी ठेवता येतात. इथं 7 सेलमध्ये 40 पुरुष तर एका सेलमध्ये 20 महिला कैदी राहू शकतात.

या सेलशिवाय इथं एक डार्क रूमसुद्धा आहे. इथं एक असिस्टंट जेलर, 5 जेल गार्ड आणि एक शिपाई आहे. 2013 मध्ये या तुरुंगाला बंद करण्याला मंजूरी देऊन भारताच्या पुरातत्व विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

2013 मध्ये या तुरुंगात 7 कैदी होते. यात दोन महिला आणि 5 पुरुषांचा समावेश होता. यातील 4 कैद्यांना अमरेलीला पाठवण्यात आले होते. तर दोघांची सुटका झाल्यानंतर एकच कैदी राहिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2019 02:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...