दलित तरुणाला मारहाण; आमदाराने दिला राज्य बंदीचा इशारा!

आरोपींना जर 24 तासात पकडले नाही तर बंदची घोषणा केली जाईल.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2019 02:49 PM IST

दलित तरुणाला मारहाण; आमदाराने दिला राज्य बंदीचा इशारा!

अहमदाबाद, 05 नोव्हेंबर: अहमदाबाद (Ahmedabad) येथील साबरमती (Sabarmati)परिसरात एका दलित तरुणाला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर संबंधित तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साबरमती परिसरातील महेश ठाकोर यांच्या हॉटेलमध्ये प्रज्ञनेश परमार गेला होता. प्रज्ञनेशकडून चुकून एक ताट खाली पडले. या किरकोळ कारणावरून महेश ठाकोर, जोगी ठाकोर आणि अन्य दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रज्ञनेश जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंदर्भात पोलीस निरीक्षक आर.एच.वाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री जेव्हा हॉटेलमध्ये प्रज्ञनेशकडून ताट खाली पडले तेव्हा मारहाण करणाऱ्यांनी प्रथम त्याच्यासोबत बाचाबाची केली. त्यानंतर अपशब्द वापरले आणि मग त्याला मारहाण केली.

या प्रकरणी महेश ठाकोर आणि अन्य तिघांच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्यांपैकी महेश याला अटक करण्यात आली असून अन्य तिघांचा शोध सुरु आहे. या घटनेनंतर दलित नेते आणि अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी(Jignesh Mewani) यांनी आरोपींना जर 24 तासात पकडले नाही तर गुजरात बंदची घोषणा केली जाईल असा इशारा दिला आहे.

यासंदर्भात त्यांनी ट्विटकरून दलित तरुणावर झालेल्या अत्याचाराचा फक्त निषेध केला जाणार नाही तर आंदोलन केले जाईल. जर सरकारने आरोपींना अटक केली नाही तर गुजर बंदची घोषणा केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

Loading...

सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काय म्हणाले, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 01:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...