धक्कादायक! सरपंचाने केलेल्या अपमानामुळे दलित अधिकाऱ्याने केली आत्महत्या

धक्कादायक! सरपंचाने केलेल्या अपमानामुळे दलित अधिकाऱ्याने केली आत्महत्या

गावातल्या एका सभेत हा सरपंच या तरुण अधिकाऱ्याचा अपमान करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याने गौतम यांना कामचोर असं म्हणत त्यांची निर्भत्सना केली. त्रिवेंद्रकुमार गौतम यांना या सरपांचाने आरक्षणाच्या मुद्द्यावरूही हिणवलं.

  • Share this:

लखीमपूर (उत्तर प्रदेश) : एका 23 वर्षांच्या तरुण अधिकाऱ्याने अपमानाला कंटाळून आत्महत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर खेरी जिल्ह्यात ही घटना घडली. गावच्या सरपंचांनी केलेला अपमान आणि मानसिक अत्याचारामुळे या अधिकाऱ्याने आत्महत्या केली.

त्रिवेंद्रकुमार गौतम या तरुणाने व्हिलेज डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम सुरू केलं होतं. त्याचं कुंभी ब्लॉक इथे पोस्टिंग झालं होतं. इथेच या तरुण अधिकाऱ्याने फास लावून घेतला.

लखीमपूरमधल्या शिवसागर भागातल्या एका भाड्याच्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. गौतम यांनी आपल्या वडिलांच्या नावाने एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी रासूलपूरच्या सरपंचांना आपल्या आत्महत्येला जबाबदार धरलं आहे.

गावातल्या एका सभेत हा सरपंच या तरुण अधिकाऱ्याचा अपमान करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याने गौतम यांना कामचोर असं म्हणत त्यांची निर्भत्सना केली.

'विक्रम'शी संपर्क तुटला तरीही Chandrayaan 2 यशस्वी, कसं ते जाणून घ्या

Loading...

त्रिवेंद्रकुमार गौतम यांना या सरपांचाने आरक्षणाच्या मुद्द्यावरूही हिणवलं. त्यामुळेच या सरपंचाला शिक्षा व्हावी, असं गौतम यांनी लिहिलं आहे. या प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी शैलेंद्र लाल यांनी दिली.

दरम्यान, या अधिकाऱ्याच्या सहकाऱ्यांनी विकास भवनाच्या बाहेर निदर्शनं केली आणि या घटनेचा निषेध केला.

=====================================================================================================

चंद्रयान मोहिमेचं कवी कसं वर्णन करतील, पाहा UNCUT पंतप्रधान मोदींचं भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 03:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...