धक्कादायक : CAAला पाठिंबा दिल्याने दलित वस्तीचं पाणीच तोडलं

धक्कादायक : CAAला पाठिंबा दिल्याने दलित वस्तीचं पाणीच तोडलं

काही दिवसांपूर्वीपासून काही मुस्लिम कुटुंबीय आपल्या बोअरवेलच्या पाण्याचा पुरवढा त्यांना करत होते. मात्र 17 तारखेपासून हा पाणीपुरवढा बंद करण्यात आलाय.

  • Share this:

मल्लपूरम 24 जानेवारी : केरळ मधल्या मल्लपूरमधली एक धक्कादायक घटना पुढे आल्याने खळबळ उडालीय. CAAवरून देशभर सध्या वातावरण तापलेलं आहे. केंद्राच्या या निर्णयाला काही संघटनांनी विरोध केलाय. यात विद्यार्थीही सहभागी आहेत. डाव्यांचं सरकार असलेल्या केरळमध्ये या कायद्याला मोठा विरोध होतोय. केरळ विधानसभेने एक ठराव मंजूर करत या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही अशीही भूमिका घेतली होती. असं तापलेलं वातावरण असतानाच CAA पाठिंबा देणाऱ्या केरळमधल्या दलित वस्तीचं पाणीच मुस्लिमांनी तोडलं असा आरोप होतोय.

कुट्टीपुरम इथल्या एका वस्तीत दलितांची 22 कुटुंब राहतात. या वस्तिजवळच्या मैदानात भाजपने CAAला पाठिंबा देण्यासाठी एका रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीत या वस्तितल्या काही नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्याचा राग आल्याने या वस्तिला पाणीपुरवठा करणाऱ्या काही मुस्लिम नागरीकांनी वस्तिचा पाणी पुरवढाच बंद केल्याचा आरोप होतोय.

निर्भया प्रकरणी 3 दोषींची पुन्हा याचिका, फाशी लांबविण्याची शेवटची धडपड

वर्षभरापासून इथल्या ग्रामपंचायतीची पाणीपुरवढा योजना बंद आहे. त्यामुळे इथल्या लोकांना एक किलोमीटर दूरवरून पाणी आणावं लागत होत. काही दिवसांपूर्वीपासून काही मुस्लिम कुटुंबीय आपल्या बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा त्यांना करत होते. मात्र 17 तारखेपासून हा पाणीपुठा बंद करण्यात आलाय.

कर्नाटक भाजपच्या नेत्या शोभा करंदळाजे यांनी ट्विटरवरून यावर टीका केलीय. या वस्तीचं पाणी तोडल्यानंतर संघशी संबंधित असलेल्या सेवा भारती ही संस्था या वस्तीला पाणी पुरवठा करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तथाकथीत पुरोगामी मंडळी आता का गप्प आहेत असा सवालही भाजपने केलाय. या घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

First published: January 24, 2020, 4:42 PM IST
Tags: CABkerala

ताज्या बातम्या