भावासाठी पाकिस्तानशी लढणारी दलबीर कौर सरबजीत सिंगची सख्खी बहीण नाही?

भावासाठी पाकिस्तानशी लढणारी दलबीर कौर सरबजीत सिंगची सख्खी बहीण नाही?

भारताचा हेर म्हणून पाकिस्तानाने कैदेत ठेवलेल्या सरबजीत सिंगच्या सुटकेसाठी लढा देणारी दलबीर कौर त्याची सख्खी बहीण नाही, अशा तक्रारी आल्यानंतर आता दलबीर यांची डीएनए चाचणी होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

चंदिगड, 18 एप्रिल : भारताचा हेर म्हणून पाकिस्तानाने कैदेत ठेवलेल्या सरबजीत सिंगच्या सुटकेसाठी लढा देणारी दलबीर कौर त्याची सख्खी बहीण नाही, अशा तक्रारी आल्यानंतर आता दलबीर यांची डीएनए चाचणी होण्याची शक्यता आहे.

सरबजीत सिंग हा सीमेजवळ राहणारा शेतकरी चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानच्या भूमीत गेला होता. पण पाकिस्तानने त्याच्यावर लाहोर बाँबस्फोट प्रकरणी हेरगिरी केल्याचे आरोप ठेवत अटक केली. सरबजीतच्या सुटकेसाठी दलबीर कौर यांनी मोठा लढा उभारला होता. सरबजीतला पाकिस्तानच्या कोर्टाने फाशीची शिक्षा दिली होती. त्याविरोधात दलबीर कौरने संघर्ष सुरू केला होता.

भारतीय वकिलात, राजनैतिक अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचून सरबजीत प्रकरणी न्यायाची मागणी करत त्या पाकिस्तानपर्यंत पोहोचल्या होत्या. अखेर 49 वर्षीय सरबजीतचा लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात इतर कैद्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता.

पंजाब सरकारच्या गृह खात्याकडे दलबीर कौर नेमकी कोण याबाबत विचारणा झाली आणि तक्रारी दाखल झाल्या. दलबीर कौर सरबजीतची कोण याचा तपास करण्यासाठी आता गृह खात्याने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

विशेष म्हणजे पंजाबच्या गृहखात्याकडे या प्रकरणी तक्रार करणाऱ्या 13 लोकांपैकी एक लातूरच्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील आहेत, अशी माहिती समोर येत आहे. या सगळ्यांनी दलबीरच्या डीएनए टेस्टची मागणी केली आहे.

न्यूज18च्या प्रतिनिधीने या संदर्भात दसबीर कौर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रकरण कोर्टात आहे, असं सांगत दलबीर यांनी यावर काही बोलण्यास नकार दिला.

सरबजीत चुकीने पाकिस्तानी सीमेत दाखल झाला होता. आपलं नाव मनजीत नसून आपली खोटी ओळख दिली जात आहे, असं सरबजीत शेवटपर्यंत सांगून पाकिस्तानात न्याय मागत होता. सरबजीत आणि दलजीत यांच्या लढ्यावर आधारित हिंदी चित्रपटही 2016 मध्ये आला होता. ऐश्वर्या राय बच्चनने त्यात दलबीर कौरची भूमिका केली होती.

VIDEO: कोणतही चिन्हं दाबलं तरी मत कमळालाच जातं: प्रकाश आंबेडकर

First published: April 18, 2019, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading