VIDEO : 'माझी वारसदार आकर्षक हवी', दलाई लामा विधानावर ठाम

VIDEO : 'माझी वारसदार आकर्षक हवी', दलाई लामा विधानावर ठाम

नोबेलविजेते तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी त्यांच्या वारसदाराबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. माझा वारसदार जर स्त्री असेल तर आकर्षक हवी, असं दलाई लामा म्हणाले होते. दलाई लामांनी 2015 मध्ये बीबीसी न्यूज ला मुलाखत देताना हे वक्तव्य केलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जून : नोबेलविजेते तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी त्यांच्या वारसदाराबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. माझा वारसदार जर स्त्री असेल तर आकर्षक हवी, असं दलाई लामा म्हणाले होते. दलाई लामांनी 2015 मध्ये बीबीसी न्यूज ला मुलाखत देताना हे वक्तव्य केलं होतं.

दलाई लामा यांच्या या वक्तव्यामध्ये लिंगभेद असल्याचा आरोप काही जणांनी केला होता. त्यामुळे ते त्यांचं वक्तव्य मागे घेतील, असं वाटत होतं. पण तिबेटी धर्मगुरू त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत.

'बीबीसी न्यूज' ला पुन्हा दिलेल्या एका मुलाखतीत दलाई लामा यांनी तसंच विधान केलं आहे. माझा वारसदार म्हणून कुणी स्त्री दलाई लामा येणार असेल तर ती आकर्षक हवी, असं ते पुन्हा म्हणाले.

जो चेहरा आकर्षक नाही त्याच्याकडे लोक ओढले जाणार नाहीत. त्यामुळे ती स्त्री दलाई लामा आकर्षकच हवी, असं त्यांचं म्हणणं होतं. दलाई लामा यांना बीबीसीच्या प्रतिनिधी रजनी वैद्यनाथन यांनी याबद्दल पुन्हा विचारलं. त्यांचं वक्तव्य लैंगिक भेदभाव करणारं नाही का ? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर दलाई लामा म्हणाले, बुद्ध धर्मामध्ये आंतरिक सौंदर्य आणि बाह्यसौंदर्य या दोन्हीलाही महत्त्व आहे.

दलाई लामा यांच्या या वक्तव्यावर ट्विटरवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दलाई लामा यांच्याकडे अवघं जग एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहतं. पण त्यांनीच असं वक्तव्य केल्याचे विपरित परिणाम होतील, असं अनेकांचं म्हणणं आहे.

================================================================================================

गच्चीतून पडलेल्या चिमुकलीसाठी 'तो' ठरला देवदूत; VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 07:46 PM IST

ताज्या बातम्या