Home /News /national /

Dalai Lama Birthday : शेतकऱ्याचा मुलगा ते नोबेल पुरस्कार, तिबेटसाठी केला जगभर संघर्ष

Dalai Lama Birthday : शेतकऱ्याचा मुलगा ते नोबेल पुरस्कार, तिबेटसाठी केला जगभर संघर्ष

चिनी दडपशाहीमुळे 31 मार्च 1959 रोजीपासून त्यांनी भारतात वास्तव्य करण्यास सुरुवात केली. भारतात राहूनही त्यांनी तिबेटचा स्वातंत्र्यलढा (Tibet Freedom) सुरूच ठेवला आहे.

    मुंबई, 6 जुलै :  तिबेटी धर्मगुरू 14वे दलाई लामा (Dalai Lama) यांचा आज वाढदिवस आहे. 6 जुलै 1935 रोजी तिबेटच्या पूर्व भागात त्यांचा जन्म झाला होता. चिनी दडपशाहीमुळे 31 मार्च 1959 रोजीपासून त्यांनी भारतात वास्तव्य करण्यास सुरुवात केली. भारतात राहूनही त्यांनी तिबेटचा स्वातंत्र्यलढा (Tibet Freedom) सुरूच ठेवला आहे. ज दलाई लामा यांना 1989 साली त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार (Nobel prize for peace) देण्यात आला होता. केवळ भारतातच नाही, तर जगभरात त्यांचे अनुयायी आहेत. शेतकरी कुटुंबात जन्म दलाई लामा यांचं नाव ल्हामो थोंडुप (Dalai Lama name) असं होतं. तिबेटच्या एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्या वेळी 13व्या दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू होता. तेव्हा दोन वर्षांचे असलेल्या ल्हामो थोंडूप यांची या पदासाठी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांना ‘तेन्जिन ग्यात्सो’ हे नाव देण्यात आलं आणि 14वे दलाई लामा (14th Dalai Lama) म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली. लामा या शब्दाचा अर्थ गुरू असा आहे. 1959 मध्ये सोडलं तिबेट चीनच्या दडपशाहीमुळे दलाई लामांना भारतात आश्रय घ्यावा लागला. 1959मध्ये ते हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात असणाऱ्या मॅक्लोडगंज येथे वास्तव्यास (Dalai Lama in India) आले. तिथून त्यांनी शांततेच्या मार्गाने चीनचा विरोध आणि शांततेच्या संदेशाचा प्रसार करण्याचं काम सुरू ठेवलं. वयाच्या 24व्या वर्षापासून ते चिनी दडपशाहीचा विरोध करत आहेत. जगभर शांततेचा प्रसार दलाई लामा यांनी आतापर्यंत 6 खंडांमधल्या 47 देशांना भेट दिली आहे. तसंच, त्यांना आतापर्यंत 150हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हे सर्व पुरस्कार (Dalai Lama Awards) त्यांना शांती, अहिंसा, सर्वधर्मसमभाव, भूतदया अशा विचारांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार-प्रसार केल्याबद्दल मिळाले आहेत. त्यांनी 110हून अधिक पुस्तकांचं सहलेखन केलं आहे. वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन दलाई लामा यांच्या 87व्या वाढदिवसानिमित्त, केंद्रीय निर्वासित तिबेट सरकारने कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूरदेखील उपस्थित राहतील. सर्वांत आधी मुख्य बौद्ध मंदिरात (Dharmshala Buddha Mandir) पूजा करण्यात येईल. त्यानंतर दलाई लामांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. कोरोना काळानंतर, दोन वर्षांनी पहिल्यांदा ते आपल्या वाढदिवसाला बौद्ध मंदिरात असणार आहेत. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर, या वर्षीच्या मार्च महिन्यापासून दलाई लामा यांनी बौद्ध मंदिरात येण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी मार्चनंतर त्यांचे दोन अध्यापन वर्गही पार पडले आहेत. कडक सॅल्यूट! बाप-लेकीनं एकत्र उडवलं हॉक 132 लढाऊ विमान, हवाई दलाच्या इतिहासातील पहिली घटना केवळ हिमाचलमध्येच नाही, तर जगभरात दलाई लामांचा वाढदिवस (Dalai Lama Birthday) साजरा करण्यात येत आहे. जगभरातले त्यांचे अनुयायी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणार आहेत.
    First published:

    Tags: China, India china

    पुढील बातम्या