Home /News /national /

दाक्षायणी बनली पहिली Trans-woman पंचायत सचिव; पूर्वी पुरुष म्हणून तिथंच करत होती काम

दाक्षायणी बनली पहिली Trans-woman पंचायत सचिव; पूर्वी पुरुष म्हणून तिथंच करत होती काम

ती म्हणते, 'मला माझ्या किशोरवयात झालेले शारीरिक बदल माहीत होते. पण मी ते व्यक्त करू शकत नव्हते. मी संपूर्ण आठवडा मुलासारखा जगायचे आणि आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी मी साडी नेसून माझ्या इच्छेनुसार आयुष्य जगायचे. हळूहळू हा प्रकार खूप वाढत गेला आणि

पुढे वाचा ...
    चेन्नई, 29 मार्च : आत्मविश्वास असलेल्या प्रत्येकाला आयुष्यात चढ-उतार आले तरी संधीही मिळत राहतात. जो आपल्या ध्येयाप्रती समर्पित असतो, त्याला अशी संधी नक्कीच मिळते. तामिळनाडूच्या पहिल्या ट्रान्सवुमन (Trans-woman) पंचायत सचिव दाक्षयणी यांची यशोगाथाही अशीच आहे. अलीकडेच, 30 वर्षीय दाक्षायणी यांची तिरुवल्लूर जिल्ह्यातील कोडिवेली पंचायतीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. घरातून पळून गेली टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 2010 ते 2015 पर्यंत, डिप्लोमा धारक दाक्षायणी पूनमल्ली यांनी पंचायत युनियनमध्ये अन्नामपेडू पंचायतीचे सचिव (Dakshayani, Tamil Nadu’s First Transwoman Panchayat Secretary) म्हणून काम केले. ती म्हणते, 'मला माझ्या किशोरवयात झालेले शारीरिक बदल माहीत होते. पण मी ते व्यक्त करू शकत नव्हते. मी संपूर्ण आठवडा मुलासारखा जगायचे आणि आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी मी साडी नेसून माझ्या इच्छेनुसार आयुष्य जगायचे. हळूहळू हा प्रकार खूप वाढत गेला आणि मग मी घरातून पळून जाऊन ट्रान्सवुमन होण्याचा निर्णय घेतला.' 2016 मध्ये लिंग बदल शस्त्रक्रिया केली घरातून पळून गेल्यानंतर ती 2015 ते 2020 पर्यंत मुंबई आणि नेपाळसारख्या ठिकाणी राहून नंतर चेन्नईला परत आले. दाक्षायणी म्हणते, 'मी सेक्स वर्कर म्हणून काम करण्याचा कधीच विचार केला नाही. मी मंदिराचा पुजारी म्हणून काम केलं आणि इतरही अनेक कामं केली. माझ्या ट्रान्सजेंडर समुदायानं मला खूप पाठिंबा दिला. या सर्वांनी मला 2016 मध्ये चेन्नईच्या किलपॉक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये लिंग बदल शस्त्रक्रिया करण्यात मदत केली.' घरवापसी दाक्षायणी पुढे सांगते, '2020 मध्ये तिच्या एका कौटुंबिक मित्रानं तिला पाहिलं आणि त्यानं मला घरी परतण्यास सांगितलं. ते मला स्वीकारतील, अशी अपेक्षाही नव्हती. माझ्या वडिलांचं निधन झाल्याचं कळलं. माझा धाकटा भाऊ एसी मेकॅनिक झाला. माझ्या आईनं मला पाठिंबा दिला आणि मला या नोकरीसाठी पुन्हा अर्ज करण्यास प्रवृत्त केलं.' हे वाचा - जे इंजिनीअर्सना जमलं नाही ते मुस्लिम गवंड्यानं केलं, मंदिरात बांधली महाघंटा पुन्हा नोकरी मिळाली दाक्षायणीनं सरकारला पत्र लिहून दीर्घकाळ कामावरून गैरहजर राहणाऱ्यांना नियमित करण्याची आणि पूर्ववत करण्याची मागणी केली होती. अनेक सरकारी अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर कैफियत मांडली. अनुकंपा कारणास्तव, तिला 24 मार्च 2022 रोजी कोडिवेली येथे पंचायत सचिव म्हणून बहाल करण्यात आलं. संपूर्ण समाजासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं दाक्षायणी यांनी सांगितलं. यामुळं इतर ट्रान्सवुमन आणि ट्रान्समेनसाठीही नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील, अशी आशा तिनं व्यक्त केली. हे वाचा - मराठमोळ्या मुलासोबत दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकतेय IAS टीना दाबी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय थिरुवल्लूरचे जिल्हाधिकारी अल्बी जॉन म्हणाले की, जेव्हा त्यांना याचिका प्राप्त झाली, तेव्हा त्यांनी त्यांच्या टीमशी चर्चा केली. सविस्तर चर्चा केल्यानंतर, त्यांनी त्याला अनुकंपा तत्त्वावर आणि लिंग-संवेदनशील दृष्टीकोन घेऊन नोकरी परत देण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी म्हणाले, 'योग्य दिशेने घेतलेला हा निर्णय आहे. लैंगिक बदलांशी संबंधित शारीरिक आणि मानसिक आव्हानांमुळे तिच्या अनुपस्थितीचा दीर्घ कालावधी होता. आम्ही एक संवेदनशील दृष्टीकोन घेतला आणि मला आशा आहे की, हे छोटं पाऊल या समाजासाठी सकारात्मक सिद्ध होईल.'
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Personal life, Transgender

    पुढील बातम्या