धक्कादायक! शँपूपासून तयार करत होते दूध; डेअरीवरच्या छाप्यातून उघड झाला भेसळीचा कहर

धक्कादायक! शँपूपासून तयार करत होते दूध; डेअरीवरच्या छाप्यातून उघड झाला भेसळीचा कहर

दुधात पाणी मिसळणं म्हणजे भेसळ नाही तर यापेक्षा इतर केमिकलचा वापर यासाठी केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

भोपाळ, 20 फेब्रुवारी : अन्न पदार्थांमध्ये होणारी भेसळ ही काही नवी गोष्ट नाही. सातत्याने असे प्रकार उघडकीस येत असतात. काही महिन्यांपूर्वी दिल्लीत मसाल्याच्या पदार्थातील जिऱ्यांची भेसळ आणि बनावट जिरे बनवणारी टोळी पकडण्यात आली होती. आता दूधात भेसळ करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. दुधात पाणी मिसळण्याचा प्रकार तसा होतच असतो पण मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात वेगळाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भिंड जिल्ह्यातील डेअर प्लांटमध्ये छापा टाकल्यानंतर दुधात चक्क डिटर्जंट, यूरिया, हायड्रोजन ल्यूब्रिकेंट, क्रिप्टो ऑइल यांसारखे धोकादायक रासायनिक पदार्थ मिसळले जात असल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिस आणि प्रशासनाने एका डेअरी प्लांटमध्ये बनावट दूध तयार करणाऱ्यांना रंगेहाथ पकडलं. लोकांच्या आरोग्याशी खेळ करून व्यावसायिकांकाडून बनावट दुधाचा पुरवठा बाजारात केला जात होता. एवढंच नाही तर वेगवेगळ्या केमिकलपासून दूध तयार केलं जात होतं.

पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बनावट दूध तयार करण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त केलं. यामध्ये पावडरची पोती, सिंथोटिक दूध तयार करण्यासाठी 300 लीटर केमिकलसह इतर साहित्याचा समावेश आहे. पोलिसांना दुधाची भेसळ होत असल्याचं समजताच छापा टाकला.

छाप्यावेळी इथेनॉलचे डबेही सापडले. याठिकाणी उपलब्ध असलेलं स्पिरिट इतकं अस्सल होतं की रुग्णालयात जखमा स्वच्छ करण्यासाठी याचा वापर केला जातो. इथेनॉलचा वापर सर्वसामान्यपणे दारु तयार करण्यासाठी केला जातो. इथेनॉल स्पिरिट असतं. याचं दीर्घकाळ सेवन करणं अनेक आजारांना आमंत्रण देणारं असतं. यामुळे कर्करोगाचा धोकाही निर्माण होतो.

वाचा : चिनी 'कोरोना'चा महाराष्ट्राला फटका, तब्बल 150 कोटींचं नुकसान

बनावट दूध तयार करण्यात येणाऱ्या प्लांटच्या परिसरात दुर्गंध पसरला होता. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या या कामाबाबत आतापर्यंत तक्रार केली नव्हती. पोलिसांना छापा टाकल्यानंतर बनावट दूध ओतून नष्ट केलं आहे.

वाचा : PUBG चा नादखुळा! घरातून गायब झाला मुलगा, तब्बल 1500 किमी दूर महाराष्ट्रात सापडला

First published: February 20, 2020, 8:10 PM IST
Tags: milk

ताज्या बातम्या