मराठी बातम्या /बातम्या /देश /

'स्टोरी फॉर ग्लोरी' कार्यक्रमाच्या अंतिम फेरीतून 12 प्रतिभावानांची निवड

'स्टोरी फॉर ग्लोरी' कार्यक्रमाच्या अंतिम फेरीतून 12 प्रतिभावानांची निवड

स्टोरी फॉर ग्लोरी या कार्यक्रमातून देशातील 12 विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.

स्टोरी फॉर ग्लोरी या कार्यक्रमातून देशातील 12 विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.

स्टोरी फॉर ग्लोरी या कार्यक्रमातून देशातील 12 विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : स्थानिक भाषांतील प्लॅटफॉर्म असलेल्या डेलीहंटने संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या #स्टोरी फॉर ग्लोरी या कार्यक्रमाचा आज समारोप करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावर आयोजित या कार्यक्रमामध्ये दोन कॅटेगरीमध्ये, व्हिडीओ आणि प्रिंटमध्ये, 12 विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.

मे मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाला 1000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 20 प्रतिभावान सहभागी निवडले गेले. निवडलेल्या उमेदवारांचा आठ आठवड्यांची फेलोशिप आणि एमआयसीए या आघाडीच्या मीडिया इन्स्टिट्यूटमध्ये दोन आठवड्यांचा लर्निंग प्रोग्राम पार पाडला. त्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर सहभागींनी त्यांच्या अंतिम प्रकल्पावर काम करताना सहा आठवड्यांचा वेळ घेतला. देशातील प्रमुख माध्यम प्रकाशन संस्थांकडून त्यांना मार्गदर्शनही करण्यात आलं. कार्यक्रमादरम्यान सहभागींनी त्यांच्या कौशल्य निर्मितीवर आणि त्यांचे कथाकथन आणि सामग्रीची कठोरता वाढवण्यासाठी अनुभवात्मक शिक्षणावर लक्ष केंद्रित केले.

अंतिम यादीत असलेल्या या 20 जणांनी आपल्या प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन केलं आणि त्यातून ज्युरींनी 12 विजेत्यांची निवड केली. #StoryForGlory ने जनसामान्यांमधून अद्वितीय प्रतिभावान लोकांना निवडलं, त्यांना पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचं करिअर तयार करण्याची आणि क्रिएटिव्ह विचारांसह त्यांच्या महत्त्वाकांक्षेला आकार देण्याची संधी दिली.

वाचा - कॅम्पस प्लेसमेंटमध्ये जॉब मिळाला नाही? टेन्शन नको; 'या' वेबसाईट्स देतील नोकरी

देशातील प्रतिभावान लोकांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मीडिया इकोसिस्टम आणि भारतातील नवोदित कथाकारांना त्यांची कौशल्ये विकसित करण्याची आणि त्यांची आवड जगासोबत शेअर करण्याची संधी या कार्यक्रमातून उमेदवारांना मिळाली.

StoryForGlory हा कार्यक्रम देभरातील विविध क्षेत्रातल्या व्हिडिओ आणि कंटेंट स्वरूपातील तसेच चालू घडामोडी, बातम्या, विज्ञान, तंत्रज्ञान, कला आणि संस्कृती यासारख्या क्षेत्रांमध्ये भारतातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण गोष्टी शोधण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे.

First published:

Tags: Delhi