नवी दिल्ली, 22 डिसेंबर : नवीन वर्षात महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. कंपन्या दररोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे खरंतर लोकांच्या मासिक बजेटवर याचा परिणाम होऊ शकतो. पीठ आणि खाद्यतेल 12-20 टक्क्यांनी वाढलं आहेत. पुढील वर्षी जानेवारीत टीव्ही आणि फ्रिजच्या किंमतीही वाढू शकतात.
या गोष्टी होणार महागड्या
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, नेस्ले, पार्ले आणि आयटीसी एफएमसीजी कंपन्यांचं म्हणणं आहे की, किंमती वाढवण्याऐवजी ते त्यांच्या उत्पादनांचा आकार कमी करतील. यामुळे लोकांवर फारसा बोजा पडणार नाही. कंपन्यांनी पॅकेटचा आकार कमी न केल्यास किंमतीत वाढ केली जाईल. दुधाच्या किंमतीत 35% वाढ झाल्यानंतर आता पीठ 18 ते 20%, साखर 14% आणि खाद्य तेलाच्या 15% महाग झाली आहे.
इतर बातम्या - विम्याच्या पैशासाठी पतीने सात जन्माचं नातं संपवलं, आय ड्रापने केली पत्नीची हत्या
जानेवारीपासून या गोष्टींच्या किंमती वाढतील
जानेवारीपासून बिस्किटे, नूडल्स, स्नॅक्स, फ्रोजन फूड, केक्स, साबण आणि तयार जेवणाच्या किंमती वाढतील. कंपन्यांचे म्हणणे आहे की, जर किंमती वाढल्या नाहीत तर त्यांची किंमत वाढेल, ज्यामुळे नुकसान होईल. तथापि, कंपन्यांचे म्हणणे आहे की कॉर्पोरेट कराच्या कपातीमुळे त्यांना फायदा झाला आहे, ज्यामुळे सध्या किंमती वाढविण्यात आल्या नाहीत. हा लाभ सरकारला मिळाला नसता तर कंपन्यांनी आतापर्यंत किंमती वाढवल्या असत्या.
इतर बातम्या - हाऊज द जोश! आर्मी ऑफिसरला पाहताच श्वाना ठोकला सलाम, PHOTO VIRAL
टीव्हीच्या किंमती वाढवतील
ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचं म्हणणं आहे की, जागतिक स्तरावर टीव्हीच्या किंमती 15 ते 17 टक्क्यांनी वाढल्या आहेत. म्हणून जानेवारीत नवीन उत्पादन येईल तेव्हा किंमती वाढतील.
जानेवारीपासून एसी-फ्रिजच्या किंमती 6,000 रुपयांनी वाढू शकतात
जानेवारीपासून एनर्जी लेबलिंगचे (New Energy Labelling Norms) नवे नियम लागू होणार आहेत. त्यानंतर 5 स्टार रेफ्रिजरेटर 6,000 रुपयांपर्यंत महाग असू शकते. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री ऑर्गनायझेशन (सीईएएमए) च्या मते, लेव्हलिंग मार्गदर्शक तत्त्वे लागू केल्यामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादकांना 5 स्टार फ्रिज थंड करण्यासाठी पारंपारिक फोमऐवजी व्हॅक्यूम पॅनेल्स वापरता येतील. म्हणून, उत्पादनाची किंमत सुमारे 6000 रुपयांपर्यंत वाढू शकते.
इतर बातम्या - ठाकरे सरकारचा भाजपला दणका, प्रभाग पद्धतीमुळे पुण्यात तोटा