‘चुलबुल पांडे’ची कार्बन कॉपी असलेला TikTok वरचा हा तरुण आहे तरी कोण?

‘चुलबुल पांडे’ची कार्बन कॉपी असलेला TikTok वरचा हा तरुण आहे तरी कोण?

दबंग-3 चित्रपटातील डायलॉग, गाणी आणि सलमानसारखा हुबेहुब केलेला अभिनय यामुळे हा तरुण सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 23 डिसेंबर: बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळखला जाणारा सलमान खानचा दबंग 3 हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. दबंगने बॉक्सऑफिसवर 50हून अधिक कोटींची कमाई केली आहे. याच सलमानची कार्बन कॉपी असणारा टीकटॉक स्टारचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत. सलमानच्या दबंग-3 चित्रपटातील डायलॉग, गाणी आणि सलमानसारखा हुबेहुब केलेला अभिनय यामुळे हा तरुण सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. सलमान खानची कार्बन कॉपी असलेला ह्या तरुणाचं नाव आहे नाजिम खान.

नाजिम खान टीकटॉकच्या जगातील सर्वात मोठा स्टार आहे. या Appवर त्याचे जवळपास 2 मिलियनहून अधिक फॉलोअर्स शेअर्स आणि तुफान कमेंट्स आहेत. सोशल मीडियावर या तरुणानं पुरता धुमाकूळ घातला आहे. सलमान खानची कार्बन कॉपी असलेल्या तरुणाचे काही खास टीकटॉक व्हिडिओ दबंग 3च्या निमित्तानं पुन्हा व्हायरल झाले आहेत.

या तरुणाच्या जवळपास प्रत्येक व्हिडिओला 20 हजारांहून अधिक लाईक्स आणि 23.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

‘दबंग 3’ सिनेमा रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया पाहता काही लोकांना हा सिनेमा खूप आवडला असला तरीही काही प्रेक्षकांच्या अपेक्षा मात्र हा सिनेमा पूर्ण करु शकलेला नाही. अनेकांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे यात सलमानचे चाहते सुद्धा आहेत. एका चाहत्यानं लिहिलं, मला सिनेमाचं तिकीट मोफत मिळालं होतं. सिनेमाचं फर्स्ट हाफ म्हणजे टॉर्चर आहे अशी सोशल मीडियावर एका युझरने प्रतिक्रिया दिली होती. सोनाक्षी आणि सलमानच्या टॉर्चरमुळे माझे काही मित्र थिएटर सोडून गेले. इतकंच नाही तर माझ्या पत्नीलाही हा सिनेमा फारसा आवडला नाही. एकंदर काय तर हा सिनेमा प्रेक्षकांना फारसा आवडलेला दिसला नाही. पण काहींनी मात्र सलमानच्या या सिनेमाचं खूप कौतुक केलं आहे. चित्रपट जरी फारसा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला नसला तरी त्यातले डायलॉग मात्र सोशल मीडियावर तुफान चालत असल्याचं पाहायला मिळत आहे. यासोबत सलमानचा डायहार्ट फॅन असणाऱ्या या तरुणानं तर नेटकऱ्यांची आणि टीकटॉकवरील तरुणींचा फॅन झाला आहे.

नाजिमच्या एक हटके व्हिडिओही सोशल मीडियावर चांगला जागला. या व्हिडिओमध्ये नाजिम चहाच्या टपरीवर असणाऱ्या बिस्कीटाचे डबे वाजवून त्यातून सुंदर धून तयार करत असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओलाही जवळपास काही हजारांमध्ये लाईक्स आहेत. नाजिमच्या या आगळ्या वेगळ्या टॅलेंटचं कौतुक नेटकऱ्यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2019 04:44 PM IST

ताज्या बातम्या