Elec-widget

न्यायमूर्ती जे.चेलमेश्वर आणि भाकप नेत्याच्या भेटीवरून वाद

न्यायमूर्ती जे.चेलमेश्वर आणि भाकप नेत्याच्या भेटीवरून वाद

चार न्यायामूर्तींनी आज पत्रकार परिषद घेतल्यानंतर डी राजा हे न्यायमूर्ती चेलमेश्वर यांच्या निवासस्थानी आले आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली

  • Share this:

12 जानेवारी : राज्यसभेचे खासदार आणि भाकपचे नेते डी.राजा यांनी न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर जे. चेलमेश्वर यांची भेट घेतल्यानं नवा वाद निर्माण झालाय.

चार न्यायामूर्तींनी आज पत्रकार परिषद घेतल्यानंतर डी राजा हे न्यायमूर्ती चेलमेश्वर यांच्या निवासस्थानी आले आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणी राजकारण करू नये अशी भावना व्यक्त होतेय.

या न्यायाधिशांनी राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊ नये अशी भावना सरकारडूनही व्यक्त करण्यात आलीय. तर या वादावर डी राजा यांनीही स्पष्टीकरण दिलंय.

चेलमेश्वर यांना आपण पूर्वीपासून ओळखत होतो. त्यांनी अतिशय धाडसी पाऊल उचललंय. त्यामुळे त्यांची भेट घेतली असं स्पष्टीकरण डी. राजा यांनी दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2018 11:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...