सायरस मिस्री यांची हकालपट्टी बेकायदेशीर, टाटा समूहाला मोठा धक्का

सायरस मिस्री यांची हकालपट्टी बेकायदेशीर, टाटा समूहाला मोठा धक्का

टाटा सन्सच्या चेअरमनपदी सायरस मिस्री यांची पुन्हा एकदा नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सायरस मिस्री यांची या पदावरून 3 वर्षांपूर्वी हकालपट्टी झाली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 डिसेंबर : टाटा सन्सच्या चेअरमनपदी सायरस मिस्री यांची पुन्हा एकदा नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सायरस मिस्री यांची या पदावरून 3 वर्षांपूर्वी हकालपट्टी झाली होती. त्याविरोधात त्यांनी राष्ट्रीय कंपनी लवादात याचिका दाखल केली होती. या लवादाने सायरस मिस्री यांना हटवण्याचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आहे. सायरस मिस्री यांच्या जागी एन. चंद्रशेखरन यांची झालेली नियुक्तीही कोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे.

सहावे चेअरमन

सायरस मिस्री हे टाटा सन्सचे सहावे चेअरमन होते. 2016 साली काही नाट्यमय घडामोडींनंतर सायरस मिस्री यांना या पदावरून हटवण्यात आलं. रतन टाटा यांच्या निवृत्तीनंतर चेअरमन झालेले सायरस मिस्री यांनी 2012 ते 2016 अशी 4 वर्षं कार्यभार सांभाळला. त्यांच्यानंतर TCS चे सीईओ एन. चंद्रशेखरन यांच्याकडे टाटा सन्सची जबाबदारी सोपवण्यात आली.

हकालपट्टीला दिलं आव्हान

सायरस मिस्री यांनी आपल्या हकालपट्टीला कोर्टात आव्हान दिलं. सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टर्लिंग इनव्हेस्टमेंट कॉर्प या कंपन्यांच्या माध्मयातून त्यांनी राष्ट्रीय कंपनी लवादाकडे दाद मागितली. सायरस मिस्री यांना हटवण्याचा निर्णय कंपनीच्या कायद्यानुसार नव्हता, असं या कंपन्यांचं म्हणणं होतं पण 2018 मध्ये राष्ट्रीय कंपनी लवादाने हे दावे फेटाळून लावले.

हेही वाचा : आता मालमत्ता खरेदीत होणार नाही फसवणूक, मोदी सरकारने आणले नवे नियम

पुन्हा केलं अपील

त्यानंतर सायरस मिस्री यांनी या निर्णयाविरोधात पुन्हा अपील केलं. आता सायरस मिस्री यांना या प्रकरणी दिलासा मिळाला आहे. टाटा सन्सच्या चेअरमनपदी त्यांची नियुक्ती पुन्हा करण्यात यावी, असे आदेश लवादाने दिले आहेत.

==========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2019 04:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading