मराठी बातम्या /बातम्या /देश /'या' दिवशी Cyclone Yass किनारपट्टीला धडकणार, PM मोदींनी घेतली उच्च स्तरीय बैठक

'या' दिवशी Cyclone Yass किनारपट्टीला धडकणार, PM मोदींनी घेतली उच्च स्तरीय बैठक

Cyclone Updates: 26 मे रोजी यास चक्रीवादळ (Yaas Cyclone) ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर येऊन धडकणार आहे. यास चक्रीवादळाची तीव्रता तौत्के चक्रीवादळापेक्षा (Tauktae Cyclone) अधिक असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 23 मे: सध्या बंगालच्या उपसागरात (Bay Of Bengal) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचं 25 मे रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. तर 26 मे रोजी हे चक्रीवादळ (Yaas Cyclone) ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर येऊन धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यास चक्रीवादळाची तीव्रता तौत्के चक्रीवादळापेक्षा (Tauktae Cyclone) अधिक असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

तौत्के चक्रीवादळचा फटका आणि यास चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता, प्रशासन सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक उच्च स्तरीय बैठक घेतली आहे. चक्रीवादळाच्या धोक्याबाबत प्रशासनानं काय तयारी केली, याचा आढावा पंतप्रधान मोदींकडून घेण्यात आला आहे. या बैठकीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, टेलिकॉम, उर्जा, सिव्हिल एव्हिएशन, अर्थ सायन्स या खात्यांचे सचिव उपस्थित होते. त्याचबरोबर या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) देखील उपस्थित होते.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर  हवामान खात्यानं ओडिशा येथील किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 'यास' चक्रीवादळ किनाऱ्यापट्टीवर  धडकल्यास, संकटाचा पूर्ण तयारीनिशी सामना करण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचं निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत.

हे ही वाचा-1 जूननंतर कसा असेल राज्यातला लॉकडाऊन? आरोग्यमंत्र्यांनी दिले 'हे' उत्तर

यास चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन भारतीय नौदलाच्या चार युध्दनौका आणि अनेक विमानं तयार ठेवली आहेत. अलीकडेच भारताच्या किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के चक्रीवादाळात भारतीय नौदलानं महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. भारतीय नौदलासोबतचं, यास चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची 17 पथकं, ओडीआरएफच्या 20 बटालियन आणि फायर सर्विसच्या 100 तुकड्या बचावकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

First published:

Tags: Cyclone, Weather forecast