मराठी बातम्या /बातम्या /देश /

Cyclone Yaas: यास चक्रीवादळ आज ओडिशा-बंगालच्या किनाऱ्याला धडकणार; 'या' राज्यांनाही हाय अलर्ट

Cyclone Yaas: यास चक्रीवादळ आज ओडिशा-बंगालच्या किनाऱ्याला धडकणार; 'या' राज्यांनाही हाय अलर्ट

Cyclone Yass: भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, यास वादळ सध्या (सकाळी सात वाजता) धामरा बंदरापासून पूर्वेला 40 किमी अंतरावर पोहोचलं असून आज हे वादळ ओडिशा (Odisha) आणि पश्चिम बंगालच्या (West bengal) किनारपट्टीवर (Coast) येऊन धडकणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

कोलकाता, 26 मे: बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) घोंघावणाऱ्या यास चक्रीवादळानं (Cyclone Yass) सोमवारी उग्र रुप धारण केलं आहे. परिणामी मंगळवारी ओडिशातील धामरा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत यास चक्रीवादल ओडिशातील पारादीप बंदरापासून 200 किमी अंतरावर होतं.

भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, हे वादाळ सध्या (सकाळी सात वाजता) धामरा बंदरापासून पूर्वेला 40 किमी अंतरावर पोहोचलं आहे. तर बालासोर बंदरापासून दक्षिण-पूर्वेला 90 किमी अंतरावर हे वादळ येऊन ठेपलं आहे. आज हे वादळ ओडिशा (Odisha) आणि पश्चिम बंगालच्या (West bengal) किनारपट्टीवर (Coast) येऊन धडकणार आहे. ओडिशा किनारपट्टीवर हे वादळ सकाळी 10-11 वाजण्याच्या सुमारास येऊन धडकेल, असा अंदाज आहे. या दरम्यान ताशी 150 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये, राज्याची राजधानी कोलकात्यासह पश्चिम मिदनापूर आणि उत्तर आणि दक्षिणेतील  24 जिल्ह्यांत 120 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं आहे की, त्या आज रात्री राज्य सचिवालयात मुक्काम करणार असून याठिकाणाहून त्या बचाव आणि मदत कार्यावर देखरेख ठेवणार आहेत.

यास चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता. या चक्रीवादळाचा फटका ओडिशा, पश्चिम बंगालसहित अन्य राज्यांना बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे झारखंड आणि बिहार या राज्यांना देखील हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल झारखंड आणि बिहारमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे. तर काही ठिकाणांना वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसानं झोडपून काढलं आहे.

हे वाचा-Yaas Cyclone : पुण्यात ढगाळ वातावरण, जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाचीही शक्यता

पश्चिम बंगालच्या पूर्वी मेदिनीपूर जिल्ह्यातील पूर्बामध्ये समुद्रात मोठं मोठ्या लाटा पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर याठिकाणी जोरदार पावसालाही सुरुवात झाली आहे. यास चक्रीवादळामुळे याठिकाणी लँडफॉलची स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे ओडिशा राज्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत. ओडिशातील केंद्रपाडा याठिकाणी वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब भर रस्त्यात कोसळला आहे. तर जगतसिंहपूर याठिकाणी झाड कोसळलं आहे. याठिकाणी बचाव दलाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

First published:

Tags: Cyclone, Odisha, West bengal