Cyclone Vayu Update : गुजरातमध्ये 6 लोकांचा मृत्यू

Cyclone Vayu Update : गुजरातमध्ये 6 लोकांचा मृत्यू

CycloneVayu Update : वायू चक्रीवादळाचा राज्याला असलेला धोका टळला असून गुजरातमध्ये मात्र समुद्राला उधाण आलं आहे.

  • Share this:

उदय जाधव ( प्रतिनिधी )

मुंबई, 13 जून,  : राज्याचं लक्ष सध्या आहे ते वायू चक्रीवादळावर. 'वायू' चक्रीवादळाने दिशा बदलून आता गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्याला समांतर अंतराने प्रवास सुरू ठेवला आहे. त्यामुळे 'वायू' चक्रिवादळाचा केंद्रबिंदू थेट समुद्र किनाऱ्याला धडकणार नाही. पण, गुजरातमध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. वेरावळ समुद्र किनाऱ्याजवळ समुद्रात 80 किलोमीटर अंतरावरून हे चक्रीवादळ पश्चिम दिशेला वळलं आहे. गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीवर वेरावळ, पोरबंदर ते द्वारकापर्यंत हे चक्रीवादळ समांतर अंतराने प्रवास करत आहे. त्यामुळे गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर ताशी 150 किमी वेगाने वारे वाहत आहेत.

थेट किनाऱ्याला वायू चक्रीवादळ धडकणार नसलं तरी पोरबंदर समुद्र किनाऱ्याला उधाण आलं आहे. गुजरातमध्ये प्रशासन सज्ज आहे. जवळपास 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून शाळांनाही दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. सध्या पोरबंद इथे ताशी 150 ते 155 किमी वेगानं वारे वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरात प्रशासनानं विमान आणि ट्रेनही रद्द केल्या आहेत.

राज्याचा धोका टळला

दरम्यान, राज्याला असलेला वायू चक्रीवादळाचा धोका टळला आहे. मुंबईच्या किनाऱ्यावर वायू चक्रीवादळ धडकणार होतं. पण, वायूचा धोका टळल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे.

राज्यात पाऊस

केरळमध्ये दाखल झालेला पाऊस आता राज्यात सक्रीय होण्याची वाट पाहिली जात आहे. राज्यातील अनेक भागात सध्या पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई, कोकण, ठाणे परिसरात देखील पाऊस पडत आहे. राज्यात भीषण दुष्काळ असल्यानं सर्वांच्या नजरा या पावसाकडे लागून राहिल्या आहेत.

राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडत असला तरी शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात मान्सून सक्रीय होण्याची वाट पाहिली जात आहे.

CycloneVayu: चक्रीवादळानं दिशा बदलली, 'वायू' आता अरबी समुद्रातच घोंगावणार

First published: June 13, 2019, 8:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading