मराठी बातम्या /बातम्या /देश /

Cyclone Tauktae : अरबी समुद्रातील बार्ज दुर्घटनाप्रकरणात मोठी कारवाई

Cyclone Tauktae : अरबी समुद्रातील बार्ज दुर्घटनाप्रकरणात मोठी कारवाई

चक्रीवादळाचा इशारा मिळूनही बार्जवरील क्रू मेंबर्सना परत येण्याबाबतच्या सूचना वेळेत न दिल्याचा आणि दुर्लक्ष केल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आहे. या भीषण दुर्घटनेत 86 जणांचा मृत्यू झाला होता.

चक्रीवादळाचा इशारा मिळूनही बार्जवरील क्रू मेंबर्सना परत येण्याबाबतच्या सूचना वेळेत न दिल्याचा आणि दुर्लक्ष केल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आहे. या भीषण दुर्घटनेत 86 जणांचा मृत्यू झाला होता.

चक्रीवादळाचा इशारा मिळूनही बार्जवरील क्रू मेंबर्सना परत येण्याबाबतच्या सूचना वेळेत न दिल्याचा आणि दुर्लक्ष केल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आहे. या भीषण दुर्घटनेत 86 जणांचा मृत्यू झाला होता.

मुंबई, 8 जुलै : तौक्ते चक्रीवादळादरम्यान (Tauktae Cyclone) अरबी समुद्रात (Arabian Sea) पापा-305 ही बार्ज (Barge) बुडून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी 3 जणांना यलो गेट पोलिसांनी शनिवारी (3 जुलै) अटक केली आहे. चक्रीवादळाचा इशारा मिळूनही बार्जवरील क्रू मेंबर्सना परत येण्याबाबतच्या सूचना वेळेत न दिल्याचा आणि दुर्लक्ष केल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आहे. या भीषण दुर्घटनेत 86 जणांचा मृत्यू झाला होता. हे तिघे पापा शिपिंग कंपनीचे (Papa Shipping Company) कर्मचारी असून, त्यात व्यवस्थापक प्रसाद गणपत राणे, संचालक नितीन दीनानाथ सिंह आणि टेक्निकल सुपरिटेंडंट अखिलेश्वर तिवारी यांचा समावेश आहे. या तिघांवर भारतीय दंडविधान कलम 304 (2), 338 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं 'मिड-डे'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. मे महिन्यात पोलिसांनी बार्ज पी-305चे कॅप्टन राकेश बल्लव यांच्यासह काही जणांवर बार्जमधल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता; मात्र बल्लव या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेतून बचावलेले बार्ज पी-305चे अभियंता मुस्तफिजूर शेख यांनी याबाबतच्या तक्रारीत असं सांगितलं, की 'मी बल्लव यांना वारंवार डिस्ट्रेस कॉल (Distress Call) देण्याची विनंती करत होतो; पण त्यांनी यासाठी 10 तासांपेक्षा अधिक उशीर केला.' पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले आरोपी राणे, सिंग आणि तिवारी यांना अन्य कर्मचाऱ्यांची सुरक्षितता न सांभाळता त्यांचं आयुष्य धोक्यात घालून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हे ही वाचा-VIDEO: गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शहराकडे जाणारा पूल गेला वाहून याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की संबंधित प्राधिकरणाने तौक्ते चक्रीवादळाबाबत आधीच इशारा जारी केला होता. असं असूनही संबंधित आरोपींनी क्रू मेंबर्सना (Crew Members) मागे परतण्यास सांगितलं नाही. या प्रकरणी 63 क्रू मेंबर्सचे जबाब नोंदवण्यात आले असून, दुर्लक्ष केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. न्यायालयाने या आरोपींना 8 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती मुंबई पोलिस दलाचे प्रवक्ते डीसीपी चैतन्य एस. यांनी दिली. या दुर्घटनेवेळी पी-305 बार्जवर एकूण 261 कर्मचारी होते. त्यापैकी 186 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाला यश मिळालं. 75 कर्मचारी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. 8 कर्मचारी अद्यापही बेपत्ता आहेत. चार जणांचे मृतदेह मिळाले असले, तरी त्यांची ओळख पटू शकलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचंही 'मिड-डे'च्या वृत्तात म्हटलं आहे.
First published:

Tags: Cyclone

पुढील बातम्या