• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Cyclone Tauktae : हाहाकार करीत तौत्के चक्रीवादळ वेळेआधीच गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं!

Cyclone Tauktae : हाहाकार करीत तौत्के चक्रीवादळ वेळेआधीच गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं!

सायंकाळी 5 वाजल्याच्या दरम्यान तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत होतं.

 • Share this:
  मुंबई, 17 मे : महाराष्ट्रासह गुजरातसह तौत्के चक्रीवादळाने कहर माजवला आहे. आताच हाती आलेल्या बातमीनुसार चक्रीवादळ वेळेआधीच जमिनीला धडकलं आहे. परिणामी प्रचंड वेगवाग वाऱ्यांमुळे गुजरातचे किनारे हलले आहेत. चक्रीवादळ धडकल्यानंतर किनाऱ्यावर मोठ्याच्या मोठ्या लाटा पाहायला मिळाल्या. सायंकाळी 5 वाजल्याच्या दरम्यान तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत होतं. चक्रीवादळ केरळ, कोकण, मुंबई करत गुजरातकडे पुढे सरकलं आहे. तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई आणि आसपासच्या उपनगरांना सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाला सामोरं जावं लागलं. दरम्यान हाती आलेल्या बातमीनुसार तौत्के चक्रीवादळ आता गुजरातच्या जमिनीवर धडकलं असून परिणामी गुजरातच्या किनाऱ्यांवर परिणाम पाहायला मिळत आहे. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर ताशी कमाल 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे ही वाचा-Tauktae : मुंबईला तर चक्रीवादळाने झोडपलं, ठाणे-डोंबिवलीत काय आहे परिस्थिती? बातमी अपडेट होत आहे...
  Published by:Meenal Gangurde
  First published: