नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : भारतावर कोरोनाचं संकट असताना बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं चक्रीवादळाचं दुसरं संकट घोंगावत आहे. 25 नोव्हेंबर रोजी तमिळनाडू, पदुचेरीला हे चक्रीवादळ धडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. या वादळाला 'चक्रवादळाला 'निवार' असं नाव देण्यात आलं आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार यावेळी साधारण वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 120 किलोमीटर असू शकतो.
तमिळनाडू आणि पदुचेरीच्या अनेक भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर मच्छीमारांना देखील समुद्रात न जाण्याचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आलाा आहे. निवार या चक्रीवादळामुळे पदुचेरी, चेन्नई आणि तमिळनाडूमधील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. पुढचे 72 तास महत्त्वाचे असणार आहेत. यावेळी अत्यावश्यक कामाविना नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन जिल्ह्याधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.
भारताला दोन चक्रीवादळाचा धोका होता मात्र त्यापैकी एक चक्रीवादळ आफ्रिकेच्या दिशेनं पुढे सरकत सोमालियामध्ये हे धडकल्यानंतर शांत झालं आणि त्यानंतर या वादळाचा भारताला धोका कमी झाला होता. आता भारताच्या दिशेनं दुसरं वादळ येत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून आता निवार चक्रीवादळ वेगानं पुढे सरकर आहे. त्यामुळे आता येणारे 72 तास खूप महत्त्वाचे असल्याचं सांगितलं जात आहेगालच्या उपसागराचे वादळ सातत्याने पुढे सरकत आहे. सध्या हे वादळ पुदुचेरीच्या दक्षिणेस 600 किलोमीटरवर आहे. हे चेन्नईपासून दक्षिण-पूर्व दिशेस 630 किमी. अंतरावर आहे. हे येत्या 24 तासात या चक्रीवादळाचं रुप बदलेल असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.