Home /News /national /

बंगालच्या उपसागरात 'जवाद' चक्रीवादळ, पुढील 6 तास अतिमहत्त्वाचे, किनारपट्टी भागात रेड अलर्ट

बंगालच्या उपसागरात 'जवाद' चक्रीवादळ, पुढील 6 तास अतिमहत्त्वाचे, किनारपट्टी भागात रेड अलर्ट

सध्या बंगालच्या उपसागर (Bay of bengal) परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा (Low pressure area) तीव्र झाला असून याचं रुपांतर जवाद चक्रीवादळात (Cyclone Jawad) झालं आहे.

    मुंबई, 04 डिसेंबर: गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रासह दक्षिण भारत आणि भारताच्या पूर्व किनापट्टीवर झपाट्याने वातावरणात बदल होतं आहेत. सध्या बंगालच्या उपसागर (Bay of bengal) परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा (Low pressure area) तीव्र झाला असून याचं रुपांतर जवाद चक्रीवादळात (Cyclone Jawad) झालं आहे. हे  चक्रीवादळ सध्या हळूहळू ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. त्यामुळे पुढील सहा तास किनारपट्टीवरील नागरिकांसाठी अतिमहत्त्वाचे ठरणार आहेत. कारण पुढील 6 तासात जवाद चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार असून याचं रुपांतर पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रात होणार आहे. उद्या रविवारी दुपारच्या सुमारास ओडिशातील पुरी येथील किनारपट्टीला जवाद चक्रीवादळ धडकणार आहे. पण त्यावेळी ते हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र असणार आहे. दरम्यान हवामान खात्याने ओडिशा आणि आंध प्रदेशाच्या पूर्व किनारपट्टीवरील बंदरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच किनारपट्टी प्रदेशातील अनेकजिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागानं सर्व मच्छिमारांना किनारपट्टी भागात परत आणलं आहे. तसेच किनारपट्टी भागात NDRF च्या टीमही तैनात करण्यात आल्या आहे. बंगालच्या उपसागरात हवामानात झटपट होणाऱ्या हवामान बदलाचा काही प्रमाणात परिणाम महाराष्ट्रावर (Weather alert in maharashtra) देखील जाणवणार असून अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हेही वाचा-'जवाद' चक्रीवादळामुळे समुद्रात उसळणार लाटा, वादळी वाऱ्यासह किनारपट्टीवर कोसळधार! हवामान खात्याने महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, बीड, लातूर, परभणी आणि जालना या सोळा जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन तासात याठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत. उद्यापासून राज्यात पुढील चार दिवस कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Weather forecast

    पुढील बातम्या