निवारनंतर आणखी एक मोठं चक्रीवादळ, 'या' दोन राज्यांमध्ये अलर्ट

निवारनंतर आणखी एक मोठं चक्रीवादळ, 'या' दोन राज्यांमध्ये अलर्ट

आणखी एक चक्रीवादळ केरळच्या किनाऱ्यावर धडकणार, या राज्यांसाठी अलर्ट

  • Share this:

चेन्नई, 03 डिसेंबर : निवार चक्रीवादळ शांत होत नाही तोपर्यंत आणखीन एका मोठ्या चक्रीवादळाचा धोका असल्याचं समोर आलं आहे. या चक्रीवादळाला बुरेवी असं नाव देण्यात आलं असून शुक्रवारी ते केरळ आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मासेमारीसाठी समुद्रकिनाऱ्यावर अथवा खाडीत न जाण्याचं यावेळी मासेमारी करणाऱ्या बांधवांना आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तमिळनाडू आणि केरळमध्ये या चक्रीवादळाचा धोका सर्वाधिक आहे. बुधवारी संध्याकाळी बुरेवी चक्रीवादळ श्रीलंकेच्या किनारपट्टीवरून पुढे सरकेल. 3 डिसेंबर रोजी मुन्नारकडे तर 4 डिसेंबरला कन्याकुमारी ते तमिळनाडूच्या दिशेनं जाईल असाही अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हे वाचा-शबरीमला, वैष्णोदेवीचा प्रसाद घरपोच मिळणार; पोस्ट खात्याची विशेष सुविधा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) चक्रीवादळ बुरेवीच्या पार्श्वभूमीवर केरळमधील तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा आणि अलाप्पुझा जिल्ह्यांसाठी 3 डिसेंबर रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने सांगितले की, चक्रवाती वादळ येत्या 4 डिसेंबरपर्यंत दक्षिण तमिळनाडूला पोहोचेल. यावेळी, दक्षिण तामिळनाडूमध्ये 2 ते 4 डिसेंबर रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे केरळचे सीएम पिनाराय विजयन म्हणाले की पंतप्रधान मोदींनी चक्रीवादळाच्या परिस्थितीविषयी माझ्याशी चर्चा केली. मी त्याला चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात केलेल्या व्यवस्थेबद्दल माहिती दिली.

बुरेवी चक्रीवादळ पुढील काही तासांत श्रीलंकेची पूर्व किनारपट्टी ओलांडेल. 3 डिसेंबरला बुरेवी तमिळनाडूच्या दक्षिण भागावर सक्रिय राहील. 3 ते 5 डिसेंबरदरम्यान तमिळनाडू आणि केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याचा अंदाज हवामना विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 3, 2020, 8:04 AM IST

ताज्या बातम्या