VIDEO : 'बुलबुल' चक्रीवादळाचे रौद्ररुप, 'या' राज्यांना धोक्याचा इशारा

VIDEO :  'बुलबुल' चक्रीवादळाचे रौद्ररुप, 'या' राज्यांना धोक्याचा इशारा

महा चक्रीवादळानंतर आता बुलबुल चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं आहे. सध्या 80 ते 90 किमी वेगानं वारं वाहत असून त्याचा वेग 130 किमी प्रतितास इतका होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : पश्चिम बंगालच्या सागर बेट आणि बांगलादेशमधील खेपुपारा या भागाला बुलबुल या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. बुलबुल चक्रीवादळ मध्यरात्री या भागात धडकले असून यामुळे मुसळधार पाऊस पडत आहे. यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय वित्त हानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

बुलबुलच्या पार्श्वभूमीवर कोलकाता विमानतळ खबरदारीचा उपाय म्हणून 12 तास बंद ठेवण्यात आलं आहे. तसेच किनारपट्टीवरील तब्बल एक लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि ताशी 135 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. हवामान खात्याचे प्रादेशिक संचालक जी.के. दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादळामुळे राज्यात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे दळणवळ सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे तर पिकांवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागलीच पिकाची शक्य तेवढी काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

चक्रीवादळाचा धोका पश्चिम बंगाल आणि बांगलादेशला आहे. तसेच पुढच्या 12 तासात हे वादळ रौद्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. हे वादळ ताशी 120 किलोमीटर या वेगाने ते ओडिशा, पश्चिम बंगालहून बांगलादेशकडे सरकत असल्याची माहिती रविवारी हवामान खात्याकडून देण्यात आली.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी पश्चिम आणि पूर्व मिदनापोर, दक्षिण आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्य़ांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 90 कि.मी. इतका होता. वाऱ्याचा वेग पुढच्या काही तासांत 110 ते 120 किमी प्रतितास इतका होण्याची शक्यता असल्याचंही हवामान विभागाने सांगितलं.

VIDEO :..जर फडणवीसांनी बहुमत सिद्ध केलं नाही? जयंत पाटलांनी वर्तवला पुढचा अंदाज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 12:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading