Home /News /national /

Cyclone Asani landfall कधी? दिशा बदलली आणि आता जमिनीला धडकण्याचा अंदाजही बदलला..

Cyclone Asani landfall कधी? दिशा बदलली आणि आता जमिनीला धडकण्याचा अंदाजही बदलला..

Cyclone

Cyclone

जगन रेड्डी यांनी किनारी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्यास सांगितले आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज राहण्यास सांगितले.

    अमरावती, 11 मे : चक्रीवादळ 'असनी' (cyclone asani) बुधवारी संध्याकाळी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील मछलीपट्टणम किनारपट्टीपासून सुमारे 20-30 किमी अंतरावर राहिलं. जोरदार वायव्येकडील वाऱ्यांमुळे वादळ जमिनीकडे सरकण्यात अडथळा (Cyclone Asani landfall) येत असल्याचं सांगण्यात आलं. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, असनीचा जोर आज रात्री उशिरा ओसरण्याची  (Cyclone Asani weakens) अपेक्षा आहे आणि गुरुवारी सकाळपर्यंत त्याचा जोर आणखी कमी होईल. आदल्या दिवशी जे वादळ 6 किमी प्रतितास वेगानं पुढे जात होतं, ते संध्याकाळपर्यंत 3 किमी प्रतितास वेगापर्यंत कमी झालं. याआधी हे वादळ नरसापुरमच्या दिशेने येऊन जमिनीला धडकेल असा अंदाज होता. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितलं की, चक्रीवादळाचा धोका आता "जवळजवळ कमी झाला आहे. परंतु इशारा किमान पुढील 24 तास चालू राहील." बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यालगतच्या अनेक जिल्ह्यांमध्ये असनीच्या प्रभावाखाली मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. सरकारी यंत्रणा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. मंगळवारपासून श्रीकाकुलम ते बापटला आणि ओंगोलपर्यंत किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये 1 सेंटीमीटर ते 6.5 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तिरुपती आणि एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातही बुधवारी पाऊस झाला. हे वाचा - खूशखबर! भारतीय सेनेत नोकरीचं स्वप्न होईल पूर्ण; आर्मीत 220 जागांसाठी Vacancy मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी किनारी जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्यास सांगितलं आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज राहण्यास सांगितलं. ते पुढे म्हणाले, 'जीवितहानी रोखण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.' त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक तिथे मदत शिबिरे सुरू करण्यास सांगितलं आणि असुरक्षित भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सांगितले. हे वाचा - VIDEO: समुद्रकिनारी वाहून आला 'रहस्यमयी रथ'; भारतात कुठून आणि कसा पोहोचला? श्रीकाकुलम, विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा आणि इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे पिकांचं खूप नुकसान झालं. वादळ कमी झाल्यानंतर नुकसानीची मोजणी केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशाखापट्टणम विमानतळावर येणारी आणि जाणारी विमानसेवा दुसऱ्या दिवशीही रद्द करण्यात आली आहे. विजयवाडा विमानतळावरही चक्रीवादळामुळे अनेक विमानसेवा दिवसभरासाठी रद्द करण्यात आल्या होत्या. तसंच, दक्षिण मध्य रेल्वेने विजयवाडा-हावडा मार्गावर आणि विजयवाडा-गुडूर भागात धावणाऱ्या अनेक गाड्या वादळामुळे रद्द केल्या.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Cyclone, Rain

    पुढील बातम्या