Amphan चक्रीवादळाचं प. बंगाल-ओडिशामध्ये थैमान, कोट्यवधीचं नुकसान तर 12 जणांचा मृत्यू

वाऱ्याचा वेग एवढा जास्त होता की अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, वीजेचे खांब रस्त्यांवर पडले तर घर आणि अनेक इमारतींची छप्पर उडून गेली.

वाऱ्याचा वेग एवढा जास्त होता की अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, वीजेचे खांब रस्त्यांवर पडले तर घर आणि अनेक इमारतींची छप्पर उडून गेली.

  • Share this:
    कोलकाता, 21 मे : देशात कोरोनासोबतच तीन दिवसांपासून अम्फान चक्रीवादळाचं थैमान सुरू आहे. कोलकाता, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये या बुधवारी या चक्रीवादळानं भयंकर रुप धारण केलं. अनेक परिसरांमध्ये मोठा पूर आला तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अम्फान वादळात 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या चक्रीवादळामुळे 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे वादळ येण्यापूर्वी ओडिशातील जवळपास 58 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. हावडा आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यात वादळामुळे झाड अंगावर पडून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे. या व्हिडीओमध्ये पाहून शकता चक्रीवादळानं कसं भयंकर रूप घेतलं आहे. हे वाचा-रेल्वे गाड्यांच्या बुकिंगला आज पासून सुरूवात, असे आहेत नवे नियम! अंगावर शहारे आणणारा भयंकर व्हिडीओ आहे. एका व्हिडीओमध्ये वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बस मागे खेचली जात असल्याचंही दिसत आहे. यावरून वाऱ्याचा वेग केवढा असेल याचा फक्त अंदाज केलेला बरा. चक्रीवादळ बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलामधील हटिया बेटच्या किनाऱ्यावर पोहोचलं. चक्रीवादळानं किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात कहर माजवला. वाऱ्याचा वेग एवढा जास्त होता की अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, वीजेचे खांब रस्त्यांवर पडले तर घर आणि अनेक इमारतींची छप्पर उडून गेली आहेत. या चक्रीवादळाचा मोठा फटका पश्चिम बंगालमध्ये बसला आहे. हे नुकसानं एवढं मोठं आहे की शब्दात व्यक्त करता येणार नाही. साधारण 1 लाख कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे पण नेमकं किती नुकसान झालं हे कळायला काही दिवस लागतील असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. हे वाचा-Cyclone Amphan : पहिल्या 4 तासांतच चक्रीवादळाचा कहर; 2 महिलांचा बळी संपादन- क्रांती कानेटकर
    First published: