सायकलने 2100 किमी दूर आजारी वडिलांना भेटायला निघाला मुलगा, वाटेत झालं माणुसकीचं दर्शन

सायकलने 2100 किमी दूर आजारी वडिलांना भेटायला निघाला मुलगा, वाटेत झालं माणुसकीचं दर्शन

हा तरुण मुंबईहून 2100 किमी दूर असलेल्या जम्मूत आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी निघाला. मात्र वाटेत त्याने जे काही अनुभवलं त्यातून माणुसकीचं दर्शन झालं

  • Share this:

जम्मू, 6 एप्रिल : देशभरात कोरोना (Covid -19) कहर वाढत असल्याने लॉकडाऊन (Lockdown) लागू केल्यामुळे मुंबईत राहणाऱ्या 30 वर्षीय आरिफकडे 2100 किमी दूर जम्मू-काश्मिरमध्ये (Jammu-kashmir) राहणाऱ्या आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी सायकलशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आरिफचे वडील गंभीर आजारी असल्याने त्यांना भेटण्याच्या ओढीने तो मुंबईहून जम्मू-काश्मिरीच्या दिशेने निघाला.

लॉकडाऊन लागू केल्यानंतर एक आठवड्याने त्याला वडिलांना ह्रदयाचा झटका आल्याची बाब कळाली. 1 एप्रिल रोजी त्याच्या वडिलांच्या हार्टअटॅक आला होता. कोणीतरी आपल्या मदतीला धावून येईल या आशेने तो मुंबईहून सायकल घेऊन निघाला. यादरम्यान सीआरपीएफचे जवान देवाप्रमाणे त्याच्या मदतीसाठी धावून आले.

संबंधित - Wockhardt मध्ये 26 नर्स, 3 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णालय केलं क्वारंटाइन

यावेळी जवान त्याच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी एका मुलाची वडिलांच्या भेटीसाठी होणारी घालमेल ओळखली. मात्र हा प्रवास सायकल करणं योग्य नसल्याचे त्याला समजावले. काश्मिरमधील सीआरपीएफच्या मदतगार हेल्पलाइनच्या कारवाईनंतर आरिफचे वडील वजीर हुसैन यांना रविवारी पंजग्रेन गावातून एका विशेष हेलिकॉप्टरने रुग्णालयात पोहोचविण्यात आले होते. सीआरपीएफचे विशेष महानिदेशक जुल्फिकार हसन यांनी सांगितले की, एका मीडिया सूत्रांच्या मदतीने आम्हाला आरिफबाबत माहिती मिळाली. त्यानंतर हेल्पलाइनने तातडीने काम सुरू केलं. आरिफला फोन करुन आणि पाच राज्यातील सीआरपीएफच्या जवांनाच्या माध्यमातून आरिफपर्यंत विविध वस्तुंची व्यवस्था करण्यात आली. गुजरातच्या वडोदरामध्ये रविवारी आरिफला जेवणाऱ्या पॅकेटमध्ये 2000 रुपये कॅश, सॅनिटायझर, मास्क आणि इतर काही वस्तू दिल्या. आरिफला एका कॅम्पमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्याच्या वडिलांची काळजी घेतली जाईल असं आश्वासनही देण्यात आलं आहे. आरिफला त्याच्या वडिलांची भेट घ्यायची इच्छा असल्याने त्याची व्यवस्था ट्रकच्या माध्यमातून करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांच्या मदतीने आवश्यक वस्तूदेखील दिल्या आहेत.

संबंधित - लॉकडाउन संपल्यावर 14 एप्रिलनंतरही निर्बंध राहण्याची शक्यता, राज्यांनी केली मागणी

First published: April 6, 2020, 3:32 PM IST

ताज्या बातम्या