Home /News /national /

Cyber Attack on Air India: एअर इंडियाचा सर्व्हर हॅक, क्रेडिट कार्डसारखी महत्त्वाची माहिती लीक

Cyber Attack on Air India: एअर इंडियाचा सर्व्हर हॅक, क्रेडिट कार्डसारखी महत्त्वाची माहिती लीक

भारताची सरकारी एअरलाइन असणाऱ्या एअर इंडियावर (Air India) एक मोठा सायबर हल्ला (Cyber Attack on Air India) झाला आहे. यामध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे.

    नवी दिल्ली, 22 मे: देश सध्या कोरोनाविरोधात (Coronavirus in India) लढत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यातच अशी बातमी समोर येत आहे की भारताची सरकारी एअरलाइन असणाऱ्या एअर इंडियावर (Air India) एक मोठा सायबर हल्ला (Cyber Attack on Air India) झाला आहे. यामध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. त्यामध्ये क्रेडिट कार्ड संबंधित माहिती, पासपोर्ट यासारखी महत्त्वाची माहिती समाविष्ट आहे. या घटनेमुळे ऑगस्ट 2011 पासून फेब्रुवारी 2021 पर्यंतचा डेटा प्रभावित झाला आहे. जगभरातील एकूण 45 लाख प्रवाशांचा डेटा लीक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान अशी माहिती मिळते आहे इतर काही इंटरनेशन एअरलाइन्सवर देखील सायबर हल्ल्याचा धोका आहे. एअर इंडियाचा सर्व्हर हॅक करत मोठ्या प्रमाणात डेटा प्रभावित झाल्याची माहिती मिळते आहे. यामध्ये एअर इंडियाच्या प्रवासी सेवा प्रणालीला लक्ष्य करण्यात आलं होतं. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार 26 ऑगस्ट 2011 ते 3 फेब्रुवारी 2021 दरम्यानच्या डेटाचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये प्रवाशांचे नाव, जन्मतारीख, फोन नंबर, पासपोर्टची माहिती, तिकिटांची माहिती, क्रेडिट कार्ड डिटेल्सचा समावेश आहे. हे वाचा-1.5 कोटी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून गिफ्ट! व्हेरिएबल DA मध्ये दुप्पट वाढ कंपनीने काय म्हटलं? एअर इंडियाने असं म्हटलं आहे की यामध्ये जगभरातील एकूण 45 लाख डेटा प्रभावित झाला आहे. आमच्या डेटा प्रोसेसरमध्ये CVV/CVC नंबर नसतात. आमच्या डेटा प्रोसेसरने हे सुनिश्चित केले आहे की, प्रभावित सर्व्हरवर कोणत्याही प्रकारची असमान्य हालचाल पाहायला मिळाली नाही. हे वाचा-अदानींच्या नेटवर्थमध्ये उसळी; बनले आशिया खंडातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती माहिती मिळताच प्रभावित सर्व्हर्स केले सुरक्षित कंपनीच्या मते या सायबर हल्ल्याची माहिती मिळताच लगेचच चौकशी केली गेली. जेवढे प्रभावित सर्व्हर्स आहेत त्यांना सुरक्षित केले गेले. क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क करण्यात आला आहे. त्यांना देखील याबाबत माहिती दिली गेली आहे. याशिवाय एअर इंडियाच्या FFP प्रोग्रॅमचा पासवर्ड देखील रिसेट करण्यात आला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Air india, Cyber crime

    पुढील बातम्या