कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पात झाला होता सायबर हल्ला पण अणुभट्टीला धोका नाही

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पात झाला होता सायबर हल्ला पण अणुभट्टीला धोका नाही

तामिळनाडूमधल्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या आयटी नेटवर्कवर सायबर हल्ला झाला होता. NPCIL (Nuclear Power Corporation of India Limited) म्हणजेच राष्ट्रीय अणुऊर्जा महामंडळाने याला पुष्टी दिलीय.

  • Share this:

पुणे, 30 ऑक्टोबर : तामिळनाडूमधल्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या आयटी नेटवर्कवर सायबर हल्ला झाला होता. NPCIL (Nuclear Power Corporation of India Limited म्हणजेच राष्ट्रीय अणुऊर्जा महामंडळाने याला पुष्टी दिलीय. NPCIL ने याबद्दल प्रसिद्धी पत्रकही काढलं आहे.

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडूमधल्या तिरुनेलवेलीमध्ये आहे.या अणुऊर्जा प्रकल्पाच्या सायबर यंत्रणेवर हल्ला झाला होता. याबदद्लची माहिती 4 सप्टेंबर 2019 रोजी CERTला देण्यात आली होती. यानंतर या घटनेचा तपास करण्यात आला.

ज्या कॉम्प्युटरवर हा सायबर हल्ला झाला तो युजर इंटरनेटशी जोडलेला होता. व्यवस्थापकीय कामासाठी वापरण्यात येणाऱ्या नेटवर्कचा तो भाग होता. या यंत्रणेचा इंटर्नल नेटवर्कशी काही संबंध नव्हता.  त्यामुळे अणुभट्टीला कोणताही धोका नाही, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. आता या महत्त्वाच्या नेटवर्कवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येतेय.

=================================================================

VIDEO : सत्तावाटपाबाबत गिरीश महाजन यांचं मोठं विधान, म्हणाले...

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-416382" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/NDE2Mzgy/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 06:05 PM IST

ताज्या बातम्या