'मी दुखावले गेलेय' : काँग्रेस नाट्यात सोनियांनी पहिल्यांदाच सोडलं मौन

'मी दुखावले गेलेय' : काँग्रेस नाट्यात सोनियांनी पहिल्यांदाच सोडलं मौन

काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष निवडला जाईपर्यंत सोनिया गांधी अंतरिम अध्यक्ष राहतील, असं ठरलं असलं, तरी सोनियांची या प्रकारावरची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : काँग्रेसच्या (Congress) कार्यकारिणीच्या (CWC)अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या अंतर्गत वादावादीबद्दल पहिल्यांदाच अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी (sonia gandhi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी दुखावले गेले आहे, असं सांगत त्यांनी हे सगळेच आपले कार्यकर्ते असल्याचं सांगितलं. या सगळ्या अंतर्गत नाट्यावर थोड्याच वेळात पडदा पडू शकतो. कारण थोड्याच वेळात सोनिया गांधींनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष निवडला जाईपर्यंत सोनिया गांधी अंतरिम अध्यक्ष राहतील. लवरात लवकर कार्यकारिणीची बैठक घेऊन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सोनियांनी दिले असल्याचं समजतं. पुढच्या 6 महिन्यात काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळवण्यासाठी बैठक घेण्यात येईल, असं काँग्रेस नेते आणि कार्यकारिणीचे सदस्य के. एच. मुनियप्पा यांनी सांगितलं.

सध्याचा काळ लक्षात घ्यायला हवा. Covid-19 च्या साथीचं संकट आहे. अशा वेळी आता सगळं विसरून एकत्र कामाला लागायला हवं. मी दुखावले गेले आहे, हे खरं आहे. पण ते माझेच सहकारी आहेत. कार्यकर्ते आहेत. झालं गेलं विसरून जाऊन आपण एकत्र काम करण्याची गरज आहे, असं सोनिया गांधी यांनी सांगितल्याचं ANI चं वृत्त आहे.

काँग्रेस पत्रकार परिषदेत सगळ्या प्रकरणावर पडदा पाडण्याची शक्यता आहे.

काँग्रेस कार्यसमितीची आजची बैठक वादळी ठरली आहे. सोनिया गांधी यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव आला. त्यानंतर राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्याने खळबळ उडाली.  काँग्रेसच्या एका गटाला राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत असं वाटतं तर दुसरा गट सोनिया गांधी यांच्यासाठी आग्रही आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 24, 2020, 6:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या