नवी दिल्ली, 28 जुलै : देशाची राजधानी दिल्लीत एका 32 वर्षीय सीआरपीएफ जवानाने छतावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मृत जवानाचे नाव मुकेश असून ते मध्य प्रदेशचे होते. मात्र बदलीनिमित्त ते नवी दिल्लीत राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छतावरुन उडी मारण्यापूर्वी मुकेश यांनी सुरीने आपल्या हाताची नस कापली होती. यामुळे खूप रक्ता वाहून गेलं होतं. छतावरुन उडी मारल्यानंतर मुकेश यांना जवळील रुग्णालयात नेण्यात आला. मात्र रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं. अद्याप घटनास्थळातून कोणतीही सुसाइड नोट हाती लागलेली नाही. याची माहिती मुकेश यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.
हे वाचा-मोठी बातमी! सायबर गुन्हे उघडकीस आणण्यात महाराष्ट्र आणि मुंबई सायबर सेलला अपयश
मंगळवारी दुपारी तणावात मुकेश यांनी हाताची नस कापली. त्यानंतर त्यांनी छतावरुन उडी मारली. सीआरपीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश रोहीणी जेलजवळ राहत होता. येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन त्याने उडी मारली. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश घरगुती विवादामुळे चिंतेत होता. मुकेश याचं कुटुंबीय जबलपूरमध्ये राहत होतं, तर त्यांची पत्नी व मुले वाराणसीला तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती. यामुळे ते तणावात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत मुकेशच्या पत्नीला कळविण्यात आले आले आहे..