भोपाळ, 16 एप्रिल : कोरोना व्हायरसची दहशत इतकी पसरली आहे की लोक आता पैशालासुद्धा घाबरत आहेत. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये रस्त्यावर कारमधून 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा फेकण्यात आल्या. त्यानंतर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं. स्थानिकांनी महानगरपालिकेत फोन केल्यानंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले. रस्त्यावर 10 हजार रुपये पडले होते मात्र त्याला कोणीही हात लावला नव्हता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, इंदौरमधील हीरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खातीपुरा इथं एका रस्त्यावर अज्ञातांनी नोटा फेकल्या. यामध्ये 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटांचा समावेश होता. लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी महानगरपालिका आणि पोलिसांना याबाबत कळवले.
काही समाजकंटकांनी या नोटा फेकल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर महानगरपालिकेच्या उच्च अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना याबाबत कळवले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून नोटांना हात लावू नका असं नागरिकांना सांगितलं.
मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये रस्त्यावर कारमधून 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा फेकण्यात आल्या. त्यानंतर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं. स्थानिकांनी महानगरपालिकेत फोन केल्यानंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले. रस्त्यावर 10 हजार रुपये पडले होते मात्र त्याला कोणीही हात लावला नाही pic.twitter.com/wbaRN5Lcss
— News18Lokmat (@News18lokmat) April 16, 2020
कोरोनाच्या भीतीने अधिकाऱ्यांनी ही सूचना दिली. यांनंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी सर्व नोटा सॅनिटाइझ केल्या आहेत. तसंच तपासणीसाठी त्या एकत्र केल्या आहेत. यावेळी योग्य ती खबरदारीही घेण्यात आली होती. नोटा एकत्र केल्यानंतर जिथं त्या फेकल्या होत्या ते ठिकाणही सॅनिटाइझ करण्यात आलं आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेज तपासलं जात आहे.
हे वाचा : कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर अंत्यसंस्काराला विरोध
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus