मराठी बातम्या /बातम्या /देश /

सावरकरांच्या पोस्टरवरुन नव्या वादाला तोंड, कर्नाटकात अनेक ठिकाणी तणाव, संचारबंदी लागू

सावरकरांच्या पोस्टरवरुन नव्या वादाला तोंड, कर्नाटकात अनेक ठिकाणी तणाव, संचारबंदी लागू

फाईल फोटो

फाईल फोटो

मंगळुरू उत्तर येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार वाय भरत शेट्टी यांनी सुरतकल चौकाला सावरकरांचे नाव देण्याची विनंती करत प्रस्ताव दिला होता.

  • Published by:  News18 Desk
शिवमोगा, 15 ऑगस्ट : कर्नाटकातील शिवमोगा शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त अमीर अहमद सर्कलमध्ये वीर सावरकरांचे पोस्टर लावण्यात आले. यानंतर मात्र, एका वादाला तोंड फुटले आहे. येथे काही मुस्लिम तरुणांनी हिंदुत्ववादी गटांनी लावलेल्या पोस्टरचा निषेध केला. मात्र, हिंदुत्ववाद्यांनी सावरकरांच्या पोस्टरला हटवण्याच्या प्रयत्नांना विरोध केला. यानंतर कर्नाटक पोलिसांनी शिवमोगा जिल्ह्यातील काही भागात संचारबंदी लागू केली आहे. यासोबतच मंगळुरूमधील सुरतकल चौकाला सावरकरांचे नाव देणारे बॅनरही हटवण्यात आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या कार्यकर्त्यांनी या बॅनरवर आक्षेप घेतला होता. एसडीपीआयच्या सुरतकल युनिटने बॅनरवर आक्षेप घेत हे बॅनर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. यानंतर महापालिका आयुक्त अक्षय श्रीधर यांनी बॅनर हटवण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर रविवारी संध्याकाळी बॅनर हटवण्यात आले. दरम्यान, यापूर्वी मंगळुरू उत्तर येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार वाय भरत शेट्टी यांनी सुरतकल चौकाला सावरकरांचे नाव देण्याची विनंती करत प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला मंगळुरू शहर महानगरपालिकेने स्विकारले होते. तर सावरकरांचे अधिकृत नाव देण्यासाठी महापालिका शासनाच्या मंजुरीची वाट पाहत आहे. या चौकाला सावरकरांचे नाव देण्याचा प्रस्ताव नगर परिषदेने मान्य केल्याचे श्रीधर यांनी सांगितले. मात्र, शासनाने अधिकृत मान्यता दिली नसल्यामुळे तक्रारी पाहता हे बॅनर काढण्यात आले आहेत. हेही वाचा - नेताजींची मुलगी अनिता बोस यांची खास मागणी; म्हणाल्या DNA चाचणी करा अन्.. एसडीपीआयच्या एका स्थानिक नेत्याने सांगितले की, सुरतकल हे सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील परिसर आहे. त्यामुळे हा मुद्दा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. एसडीपीआय या चौकाला सावरकरांचे नाव देण्याच्या विरोधात असल्याचेही ते म्हणाले.
First published:

पुढील बातम्या