क्रिप्टोकरन्सी कंपनीच्या CEOचा मृत्यू, गुंतवणूकदारांचे हजारो रुपये ‘लॉक’

क्रिप्टोकरन्सी कंपनीच्या CEOचा मृत्यू, गुंतवणूकदारांचे हजारो रुपये ‘लॉक’

क्रिप्टोकरन्सीमध्ये केलेली तब्बल 1350 कोटींची गुंतवणूक धोक्यात आली आहे. कारण, जेराल्ड कॉटन या कंपनीच्या सीईओचा भारत दौऱ्यादरम्यान आजारपणामुळे मृत्यू झाला आहे.

  • Share this:

6 फेब्रुवारी, मुंबई : बिटकॉईन, लाईटकॉईन आणि एथेरियम. ही आहेत काही प्रचिलित क्रिप्टोकरन्सिची नावं. सध्या जगभरात याचा क्रिप्टोकरन्सीचा बोलबाला आहे. अनेकांच्या मुखी याच्याच चर्चा रंगल्या आहेत. अनेकांनी यामध्ये कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक देखील केली आहे. पण, अशाच प्रकार क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवण्यात आलेले 190 मिलियन डॉलर अर्थात 1350 कोटी रूपये गुंतवणूकदारांना परत मिळणार का? याबद्दल शंका आहे. कारण, क्रिप्टोकरन्सी कंपनी असलेल्या 'क्वाड्रिगा सीएक्स' या कंपनीच्या सीईओचा मृत्यू झाला आहे. जेराल्ड कॉटन असं या कंपनीच्या सीईओचं नाव आहे. जेराल्ड कॉटन यांचा भारत दौऱ्यादरम्यान वयाच्या 30व्या वर्षी आजारपणामुळे मृत्यू झाला.

परिणामी, कंपनीच्या बँक खात्याला अक्सेस करणं कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. फेसबुकच्या माध्यमातून कंपनीनं त्याची माहिती ग्राहकांना दिली आहे.

जेराल्ड यांचा लॅपटॉप, ईमेल, मेसेजिंग सिस्टम सर्व काही एनस्क्रिपटेड होतं. बँक खात्याचा पासवर्ड केवळ जेराल्ड कॉटन यांनाच ठाऊक होता. त्यामुळे या पुढील आर्थिक व्यवहार करणं कपंनीला जोखमीचं होऊन बसलं आहे. यापूर्वी अनेक कंपन्यांवरती सायबर अटॅक झालेला होता. या साऱ्या बाबींचा सारासार विचार करता जेराल्ड यांची चिंता योग्य आहे.

जेराल्ड यांच्या पत्नीनं कोर्टात अॅफिडेव्हिट सादर केलं असून, यामध्ये त्यांनी कंपनीचं खातं अॅक्सेस करण्याची परवानगी मागितली आहे. जेणेकरून समस्या सुटतील असं त्या अॅफिडेव्हिटमध्ये म्हटलं आहे.

कंपनीचं स्पष्टीकरण

'मागील काही दिवसांपासून आम्ही या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत. शिवाय, खात्याच्या सुरक्षेसंदर्भातील सर्व खबरदारी घेण्यात आली असून आम्हाला सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत करायचे आहेत. पण, पासवर्ड नसल्यामुळे आम्ही त्यासाठी असमर्थ ठरत आहोत' असं कंपनीचं म्हणणं आहे.

भारतात सुरू करायचा होता अनाथ आश्रम

जेराल्ड कॉटन भारत दौऱ्यावर असताना आजारपणामुळे मृत्यू झाला. दरम्यान, जेराल्ड यांना भारतामध्ये अनाथ आश्रम सुरू करायचा होता. त्यासाठी देखील जेराल्ड यांचे प्रयत्न सुरू होते. जेराल्ड यांच्या मृत्यूची बातमी कंपनीनं १४ जानेवारी रोजी जाहीर केली.

बिटकॉईनला भारतात बंदी

भारतात देखील यापूर्वी बिटकॉईनचा बोलबाला होता. अनेकांनी त्यामध्ये गुंतवणूक देखील केली. त्यासंदर्भातील काही व्हिडीओ देखील समोर आले होते. त्यानंतर या साऱ्या प्रकरणाची भारत सरकारनं गंभीर दखल घेत देशात बिटकॉईनवर बंदी घातली. शिवाय, गुंतवणूकदारांना खबरदारीचं आवाहन देखील केलं.

चोरीच्या संशयावरून लोकांना लाथा-बुक्यांनी मारत राहिले भाजपचे कार्यकर्ते, VIDEO व्हायरल

First published: February 6, 2019, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading