मराठी बातम्या /बातम्या /देश /

क्रूरतेचा कळस! जन्मदात्या पित्यानेच अल्पवयीन मुलीवर केला अनेक वेळा बलात्कार

क्रूरतेचा कळस! जन्मदात्या पित्यानेच अल्पवयीन मुलीवर केला अनेक वेळा बलात्कार

45 वर्षांच्या वडिलांनी (Father) आपल्या 12 वर्षाच्या मुलीवर (12 Year old girl) अनेकदा बलात्कार (Rape) केला आहे. नोकरी (Job) सुटल्यानंतर वडील 3 महिने बेरोजगार होते. याकाळातचं त्यांनी आपल्या मुलीला वासनेचा शिकार बनवलं होतं.

  • Published by:  News18 Desk
रांची, 30 डिसेंबर: देशात अल्पवयीन मुलींवर (Minor girl) होणाऱ्या बलात्काराची (Rape) प्रकरणं वाढतच चालली आहेत. अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारातील आरोपी व्यक्ती ही ओळखीची किंवा जवळच्या नात्यातील असते, अशाप्रकारची अनेक संशोधनं यापूर्वी प्रसिद्ध झाली आहेत. बदनामी होऊ नये म्हणून अशाप्रकारची प्रकरणं प्रामुख्याने दाबली जातात. अशातच बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील नराधम बापाने (Father) आपल्या 12 वर्षाच्या पोटच्या मुलीचा अनेकवेळा  बलात्कार (Raped Many times) केला आहे. सदर घटना झारखंडमधील (Jharkhand) चुटिया (Chutiya) येथील आहे. येथील एका वडिलावर स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपीच्या पत्नीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार, 45 वर्षांच्या वडिलांनी आपल्या 12 वर्षाच्या मुलीवर अनेकदा बलात्कार केला आहे. नोकरी सोडल्यानंतर वडील 3 महिने बेरोजगार होते. याकाळातचं त्यांनी आपल्या मुलीला वासनेचा शिकार बनवलं होतं. या प्रकरणाची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईनं चुटिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडिलांना मंगळवारी अटक केली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे. अल्पवयीन पीडित मुलगी मूळ बिहारमधील जहानाबाद येथील रहिवाशी आहे. पण सध्या ती चुटियामध्ये राहते. तर अल्पवयीन मुलीची  आई घर चालविण्यासाठी रांची येथील एका शॉपिंग मॉलमध्ये काम करते. आरोपी वडील गार्ड म्हणून काम करायचे, पण लॉकडाऊन दरम्यान त्यांची नोकरी गेली. गेल्या तीन महिन्यांपासून ते बेरोजगार होते. यामुळे मुलगी एकटी घरी राहत होती. यामुळं आरोपी वडीलांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. अल्पवयीन मुलीच्या मावशीने दिली माहिती नोंदवलेल्या तक्रारीनुसार, 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराची माहिती तिच्या आईला मिळाली. ही माहिती तिच्या लहान बहिणीने दिली होती. तिनं फोन करून सांगितलं की, सोमवारी ही अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना वडिलांनी तिच्यावर दुपारी 12 वाजता बलात्कार केला. याआधीही त्यानं तिच्यावर चार-पाच दिवस बलात्कार केला होता. याची माहिती मिळताच पीडित मुलीची आई घरी पोहोचली आणि तिनं मुलीकडून सर्व माहिती घेतली. यानंतर तिनं चुटिया पोलीस ठाण्यात जावून त्वरीत गुन्हा दाखल केला.
First published:

Tags: Crime, Ranchi, Rape

पुढील बातम्या