'आम्ही त्यांना माफ करणार नाही' : कारवाईनंतर CRPF ने व्यक्त केला निर्धार

'आम्ही त्यांना माफ करणार नाही' : कारवाईनंतर CRPF ने व्यक्त केला निर्धार

पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी भारतीय सैन्याला आणखी एक मोठं यश मिळालं. त्यानंतर ट्वीट करत CRPF ने हा निर्धार व्यक्त केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मार्च पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. हा हल्ला आम्ही विसरलेलो नाही आणि हल्लेखोरांना माफ करणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत CRPF च्या वतीने निर्धार व्यक्त करण्यात आला. काश्मीर खोऱ्यात पोलीस दल आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. त्याचा उल्लेख करन CRPF ने हा निर्धार ट्विटरवरून व्यक्त केला.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी भारतीय सैन्याला आणखी एक मोठं यश मिळालं. 14 फेब्रुवारीला झालेल्या भ्याड हल्ल्याच्या दिवशी गाडीमध्ये स्फोटकं ठेवणाऱ्या दहशतवाद्यालाही जवानांनी ठार केलं.

ती स्फोटकं ठेवणारा ठार

रविवारी (10 मार्च) दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीमध्ये जवानांनी मुदस्सिर अहमद खान नावाच्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. याव्यतिरिक्त जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद भटचाही जवानांनी रविवारी चकमकीदरम्यान खात्मा केला. वाहन विकत घेण्यासाठी आणि घटनास्थळावर वाहन आणण्यासाठी मदत केल्याचा आरोप सज्जादवर होता. पुलवामा हल्ल्यानंतर काही दिवसांनी त्राल परिसरात झालेल्या आयईडी हल्ल्यामागेही सज्जादचा हात होता. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने आपली दहशतवादाविरोधातील मोहीम आणखी तीव्र स्वरूपात केली आहे.

त्राल चकमकीत जवानांना मोठं यश, 3 दहशतवाद्यांचा केला खात्मा

या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या मोहीमेमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे.ला. पुलवामा हल्ल्यामध्ये घातपातासाठी ज्या गाडीचा वापर करण्यात आला होता, त्यामध्ये स्फोटकं ठेवण्याचे काम दहशतवादी मुदस्सिरने केल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दहशतवादी मुदस्सिर 24 वर्षांचा होता. 2018मध्ये तो 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये सहभागी झाला होता. जैशनं घडवून आणलेल्या अनेक घातपाताच्या कारवायांमध्ये त्याचा समावेश होता. मुदस्सिरने पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड कामरानसोबत स्फोटकं बनवली आणि हीच स्फोटकं त्यानं वाहनात ठेवण्याचं काम केले होतं. कामरान आणि मुदस्सिरने वाहन आत्मघातकी हल्ल्यासाठी विशेष पद्धतीची स्फोटकं बनवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत जवानांनी कामरानला यमसदनी धाडले होते.

कोण होता मुदस्सिर अहमद खान?

जैश-ए-मोहम्मदचा 24 वर्षांचा दहशतवादी मुदसिर अहमद खान याने पुलवामा हल्ल्याची योजना आखल्याची माहिती समोर आली आहे. तो व्यवसायाने इलेक्ट्रिशयन होता. 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. मुदस्सिरने आत्मघाती हल्ला घडवण्यासाठी आदिल या दहशतवाद्याला वाहन आणि स्फोटके मिळवून दिली होती. फेब्रुवारी 2018 मध्ये संजावान येथे लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागेही त्याचा हात होता. या हल्ल्यात 6 जवान शहीद आणि एक नागरिकाचा मृत्यू झाला होता.

उदयनराजेंनी उचलला शिवापूर दर्ग्यातला दगड, VIDEO व्हायरल

First published: March 11, 2019, 6:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading