सुकमा : माओवादी हल्ल्यातील शहिदांची संख्या 26 वर

सुकमा : माओवादी हल्ल्यातील शहिदांची संख्या 26 वर

छत्तीसगडच्या सुकमामध्ये केंद्रीय राखीव दलाच्या जवानावर माओवाद्यांचा हल्ला केला. या हल्ल्यात 24 जवान शहीद झाले

  • Share this:

24 एप्रिल : छत्तीसगडच्या सुकमामध्ये केंद्रीय राखीव दलाच्या जवानावर माओवाद्यांचा हल्ला केला. या हल्ल्यात शहिदांचा आकडा 26 वर पोहचलाय.

छत्तीसगडच्या सुकमामध्ये पुन्हा एकदा सीआरपीएफचे जवान शहीद झाले आहेत. 26 जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिलीय. 6 जवान गंभीर जखमी आहेत त्यांना हेलिकॉप्टरमधून उपचारासाठी रायपूरला नेण्यात आलंय. सुकमा जिल्ह्यातल्या  चिंतागुफा परिसरात हा हल्ला करण्यात आलाय. या ठिकाणी  रस्ता बांधण्याचं काम सुरू होतं. त्याला हे जवान सुरक्षा पुरवत होते. जवळपास 300 माओवाद्यांनी सापळा रचून हा हल्ला केला.  माअोवाद्यांनी सापळा रचला होता त्यात हे जवान अडकले. त्यानंतर दोन ते तीन तास चकमक सुरू होती.

एवढंच नाहीतर जवानांच्या एके 47 रायफली आणि ग्रेनेड माओवाद्यांनी पळवून नेली. या घटनेनंतर केंद्रीय गृह सचिवांनी तातडीनं बैठक बोलावली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग यांनीही रायपूरमध्ये बैठक घेतली.

चकमकीत शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव आणण्यासाठी कोब्रा बटालियन रवाना झाली आहे. अंधार झाल्यामुळे या परिसरात हॅलिकाॅप्टर उतरवण्यास अडचण येतेय. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंत जवानाेच पार्थिव आणले जाणार आहे. गेल्याच महिन्यात सीआरपीएफचे 12 जवान शहीद झाले होते.

First published: April 24, 2017, 5:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading