काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना सीआरपीएफचं जशास तसं उत्तर?

काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना सीआरपीएफचं जशास तसं उत्तर?

  • Share this:

14 एप्रिल :  सीआरपीएफच्या जवानाला काश्मीरी जमाव मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरला झाला आणि त्याच्यावर देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आता सीआरपीएफचे जवान दगडफेक करणाऱ्यांना जशास तसं उत्तर देताना दिसतायत.

लष्कराच्या जीपवर एका काश्मिरी तरुणाला बांधण्यात आलं असून लाऊडस्पिकरवरुन दगडफेक करणाऱ्या काश्मिरींची अशी गत होईल' अशा पद्धतीची चेतावणी दिली जात असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी फोटोंसहित हा व्हिडीओ ट्विट केला आहे. ओमर अब्दुल्ला यांच्या या ट्विटमुळे या घटनेला वेगळं वळण लागलं आहे.

याची तात्काळ चौकशी झाली पाहिजे असं ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये जीपच्या मागे लष्कराचा एक ट्रकही जाताना दिसत आहे.

पोटनिवडणुकीसाठी तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांशी काही काश्मिरी तरुण गैरवर्तन करताना आणि मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

एका अर्थानं जमावाच्या मारहाणीपासून बचाव करण्यासाठी काश्मीरी शस्त्राचाच ढाल म्हणून वापर केला गेलाय. पण आर्मीच्या ह्या कृत्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. लष्करानेही  या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत.

First published: April 14, 2017, 4:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading