मराठी बातम्या /बातम्या /देश /

Pulwama हल्ल्यानंतर CRPF कडून धक्कादायक माहिती समोर, गृहमंत्रालयाकडे पाठवला अहवाल

Pulwama हल्ल्यानंतर CRPF कडून धक्कादायक माहिती समोर, गृहमंत्रालयाकडे पाठवला अहवाल

14 मे 2000 ला जम्मू मध्ये लष्कराच्या कॅन्टॉनमेंटच्या तळावर मोठा हल्ला करण्यात आला होता. यात 36 जणांचा मृत्यू झाला होता.

14 मे 2000 ला जम्मू मध्ये लष्कराच्या कॅन्टॉनमेंटच्या तळावर मोठा हल्ला करण्यात आला होता. यात 36 जणांचा मृत्यू झाला होता.

गेल्या 15 दिवसांमध्ये 3 वेळा सीआरपीएफचा ताफा हलवला असल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. ज्यापद्धतीने हा हल्ला झाला त्याप्रमाणे या सगळ्याला स्थानिकांची मदत आहे.

पुलवामा, 15 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या हल्ल्याचा अहवाल हा सीआरपीएफकडून गृहमंत्रालयाकडे सोपवण्यात आला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी IED द्वारे आत्मघातकी हल्ला केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं स्थानिक मदतीशिवाय शहरात आणणं दहशतवाद्यांना शक्य नाही असा खळबळजनक खुलासा सीआरपीएफच्या अहवाला मांडण्यात आला आहे.

'गेल्या 15 दिवसांमध्ये 3 वेळा सीआरपीएफचा ताफा हलवला' असल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. ज्यापद्धतीने हा हल्ला झाला त्याप्रमाणे या सगळ्याला स्थानिकांची मदत आहे. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच दहशतवाद्यांकडून अशा प्रकारे 'वाहनांवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे' असे महत्त्वाचे मुद्दे या अहवालात मांडण्यात आले आहे.

सीआरपीएफने हल्ल्याचे संपूर्ण तपशील अहवालात नमूद करत हा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने लगेचच पाऊलं उचलावी असंही या अहवालात लिहण्यात आलं आहे.

दरम्यान, आता या अहवालावर आता केंद्रीय पातळीवर बैठका होतील आणि त्यानंतर यावर कारवाई करण्यात येईल. पण या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट होते की, स्थानिकांच्या मदतीने हल्ले घडवण्यात येत आहेत.

तर एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांची ने-आण करण्यासाठी काश्मीरमध्ये परवाणगी नाही आहे. गाड्यांची अदला-बदल, स्फोटकांचा एवढा साठा यासाठी स्थानिक पातळीवर परवाना लागतो. तो कसा देण्यात आला असाही संशय आता व्यक्त करण्यात येत आहे.

या सगळ्या बाबी आता लक्षात घेत. स्थानिक आणि शहरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरूवारी पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 37 जवान शहिद झाले. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असून लोक रस्त्यावर उतरले आहे. देशातील अनेक भागत पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात येत असून दहशतवाद्यांचा खात्मा करा अशी मागणी देखील केली जात आहे. दरम्यान, जम्मूमध्ये देखील लोक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी त्यांनी भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पण, जम्मूतील काही भागामध्ये आता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

pulwama terror attack : भाजप सरकारने केली होती सुटका, आता तोच दहशतवादी बनला डोकेदुखी

‘ज़िंदा रहने के मौसम बहुत हैं मगर, जान देने की रुत रोज़ आती नहीं...’ महाराष्ट्रातील शहीद सुपुत्राची कहाणी

Pulwama Terror Attack- घरातील कमावता एकुलता एक मुलगा शहीद

37 जवान शहिद

स्फोटकांनी भरलेली कार जवानांच्या ताफ्यावर आदळून दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात 37 जवान शहिद झाले. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. पाकिस्तानविरोधी जोरजार घोषणाबाजी करत, सूड घ्या अशी मागणी आता देशातून करण्यात येत आहे.

VIDEO : Pulwama दहशतवादी हल्ल्याचा घटनाक्रम

First published:

Tags: CRPF, Jammu kashmir, Pulwama attack, Pulwama terror attack, Terror attack