पुलवामामध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला; 3 दहशतवादी ठार, 4 जवान शहीद

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला; 3 दहशतवादी ठार, 4 जवान शहीद

उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या तळावर झालेला हा मोठा हल्ला आहे. दहशतवाद्यांच्या आत्मघातकी पथकाने येथील लेथीपोराच्या परिसरात २.१० च्या सुमारास प्रवेश केला

  • Share this:

पुलवामा, 31 डिसेंबर:  काश्मीरच्या  पुलवामा जिल्ह्यात असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जवान शहीद तर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. अजूनही चकमक सुरू आहे.

आज पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला चढवला आहे . अवंतीपोरा सेक्टरमध्ये सीआरपीएफचे प्रशिक्षण केंद्र आहे. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दोन ते तीन दहशतवाद्यांनी प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात प्रवेश केला होता.   त्यांनी बेछुट गोळीबाराला सुरूवात केली. त्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु झालेली चकमक अजूनही सुरू आहे.

उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या तळावर झालेला हा मोठा हल्ला आहे. दहशतवाद्यांच्या आत्मघातकी पथकाने येथील लेथीपोराच्या परिसरात २.१० च्या सुमारास प्रवेश केला. जम्मू-काश्मीर कमांडो प्रशिक्षण तळाच्या बाजूला तैनात असणाऱ्या भारतीय जवानांच्या लक्षात दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे लक्षात आले. त्यांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दहशतवाद्यांनी सुरूवातीलाच अचानकपणे ग्रेनेड हल्ला आणि अंदाधुंद गोळीबाराला सुरूवात केल्याने लष्कराचे काही जवान जखमी झाले होते. सकाळी या जखमींपैकी एका जवानाचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही ही चकमक सुरूच होती.

आता हाती आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांची संख्या चारवर गेली आहे. तर आतापर्यंत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मात्र, अजूनही काही दहशतवादी येथील रहिवासी इमारतीमध्ये लपून बसले आहेत. त्यामुळे ही चकमक आणखी काही काळ सुरू राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2017 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...