Home /News /national /

झाडाखाली झोपलेल्या वाघाला मेलेला समजून गावकऱ्यांची गर्दी; तेवढ्यात हालचाल झाली अन्...

झाडाखाली झोपलेल्या वाघाला मेलेला समजून गावकऱ्यांची गर्दी; तेवढ्यात हालचाल झाली अन्...

वाघाला पाहण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.

    जयपूर, 7 मार्च : राजस्थानमधील (Rajasthan News) अलवरच्या माधवगडाजवळ झाडाच्या सावलीखाली आराम करणारा वाघ एसटी 14 चा बछडा आहे. त्याचं वय 22 महिने आहे. तो शिकार करून आराम करण्यासाठी झाडाच्या सावलीखाली झोपला होता. गावकऱ्यांना वाटलं त्याचा मृत्यू झाला म्हणून अनेकांनी गर्दी केली. मात्र काही वेळाने त्याची हालचार पाहून गावकऱ्यांची भंबेरी उडाली. यानंतर वन विभागाला बोलावण्यात आलं. त्यांनी सांगितलं की, हा वाघ एसटी 14 चा पूत्र आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून माधवगड भागात तो अनेकदा दिसून आला आहे. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाला आहे. अद्याप याचं नामकरण करण्यात आलेलं नाही. रोड क्रॉस करताना पाहिलं आणि... सुरुवातील कोणी गावकऱ्याने वाघाला झाडाखाली पाहिलं. यानंतर आजूबाजूच्या भागात वाघ मरून पडल्याची अफवा पसरली. यानंतर त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली. लोकांची गर्दी झाल्यावर वाघाने हालचाल केली. यानंतर गावकरीही अलर्ट झाले. गावकऱ्यांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली. वन विभागाच्या तज्ज्ञांनी सांगितलं की, एसटी 14 चा बछडा आपली टेरीटरी तयार करीत आहेत. म्हणजे आता तो एसटी 13 पासून वेगळा झाला आहे. सध्या तो जंगलात स्वत:चा एरिया तयार करीत आहे. अद्याप या वाघाचं नामकरण करण्यात आलेलं नाही. हे ही वाचा-10वर्षांनी मोठ्या विवाहितेवर जडलं प्रेम; तरुणानं अनैतिक संबंधातून केला भलताच खेळ टायगर एसटी 13 चा मृत्यू? अलवर सरिस्कामध्ये 53 दिवसांपासून एसटी 13 चा शोध घेतला जात आहे. अद्याप त्याची माहिती मिळू शकलेली नाही. शिकार झाल्याचं संशय व्यक्त केला जात आहे. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं नेमकं वृत्त देता येऊ शकत नाही. गेल्या दोन महिन्यात जंगलाजवळील भागात 4 बिबट्यांचीव शिकार झाली आहे. त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर एसटी 13 बेपत्ता झाला होता. मात्र अद्याप त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळू शकलेली नाही.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Rajasthan, Tiger

    पुढील बातम्या