मराठी बातम्या /बातम्या /देश /भारतातील ट्विटरवर संकट; माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाचे आदेश धुडकावले

भारतातील ट्विटरवर संकट; माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाचे आदेश धुडकावले

नव्या आयटी नियमानुसार सोशल मीडिया कंपन्यांनी व्यापक तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची गरज आहे.

नव्या आयटी नियमानुसार सोशल मीडिया कंपन्यांनी व्यापक तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची गरज आहे.

नव्या आयटी नियमानुसार सोशल मीडिया कंपन्यांनी व्यापक तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची गरज आहे.

मुंबई, 28 मे : ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम (Twitter, Facebook and Instagram) यांसारख्या सोशल मीडिया कंपन्यांना (Social Media Companies) त्यांच्या माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या कंटेंटवर (Content) लक्ष ठेवण्यासाठी खास अधिकारी नेमण्याच्या सूचना केंद्र सरकारने 25 फेब्रुवारी रोजी दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दिलेली तीन महिन्यांची मुदत 26 मे रोजी संपत आहे. दरम्यान, त्याची माहिती न आल्याने हे प्लॅटफॉर्म बंद होणार अशी चर्चा सुरू होती.

पीटीआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, गुगल, फेसबुक, व्हॉट्सअॅप यांनी नवीन सोशल मीडिया कायद्यानुसार IT मंत्रालयाला आवश्यक माहिती पुरवली आहे. यामध्ये ट्वीटर अद्याप नवीन सोशल मीडिया नियमांचं पालन करीत नसल्याचं समोर आलं आहे. याशिवाय ट्विटरने नवीन सोशल मीडिया नियमांनुसार खास अधिकारी नेमणुकीबाबत कोणतीही माहिती आयटी मंत्रालयाला दिलेली नाही. त्यामुळे ट्वीटवर आयटी मंत्रालयाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा-Explainer : भारतातल्या सोशल मीडियाला पाळावे लागणारे नियम काय आहेत?

IT Rules 2021नुसार काय अपेक्षित आहे?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी असलेल्या IT Rules 2021 नुसार या कंपन्यांना भारतात तक्रार निवारण अधिकारी (resident grievance officer) नियुक्त करावा लागणार आहे. प्लॅटफॉर्मवरच्या कंटेंटचं सक्रियपणे मॉनिटरिंग करणं, तक्रारींची दखल घेऊन प्रतिसाद देणं, बदला घेण्याच्या उद्देशाने केलेल्या पॉर्न पोस्ट्ससारखा कंटेंट तातडीने माध्यमावरून हटवण्याची प्रक्रिया, भारतीय युझर्सचा मासिक कम्प्लायन्स रिपोर्ट, स्व-नियंत्रण मेकॅनिझम आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने तयार केलेलं ओव्हरसाइट मेकॅनिझम आदी गोष्टी या नियमांनुसार करणं या कंपन्यांना बंधनकारक आहे.

IT Rules 2021च्या कक्षेत कोणत्या कंपन्या येतात?

50 लाखांहून अधिक युझर्स असलेल्या सर्व महत्त्वाच्या सोशल मीडिया कंपन्या या नियमांच्या कक्षेत येतात. म्हणजेच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, कू (Facebook, Twitter, Instagram, Koo) यांच्यासारख्या सगळ्या महत्त्वाच्या सोशल मीडिया कंपन्यांचा यात समावेश होतो. मार्च 2021च्या आकडेवारीनुसार, भारतात व्हॉट्सअॅपचे 39 कोटी युझर्स आहेत. स्टॅटिस्टा या रिसर्च फर्मच्या जानेवारी 2021च्या आकडेवारीनुसार, फेसबुकचे भारतात सर्वाधिक म्हणजे 32 कोटी युझर्स आहेत. फेसबुकचे अमेरिकेत 19 कोटी, तर इंडोनेशियात 14 कोटी युझर्स आहेत. जानेवारी 2021च्या आकडेवारीनुसार ट्विटरचेही भारतात 1.75 कोटींहून अधिक युझर्स आहेत. नवीनच असलेल्या आणि भारतातच तयार झालेल्या कू या सोशल मीडियाने 60 लाख युझर्सचा टप्पा पार केला आहे.

तक्रार निवारण यंत्रणा (grievance redressal mechanism) कशी असेल?

नव्या आयटी नियमानुसार सोशल मीडिया कंपन्यांनी व्यापक तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची गरज आहे. त्यात चीफ कम्प्लायन्स ऑफिसर, नोडल काँटॅक्ट पर्सन आणि रेसिडेंट ग्रिव्हान्स ऑफिसर असे अधिकारी असण्याची गरज आहे. सर्व कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइट्स आणि अॅप्सवर ही माहिती प्रसिद्ध करणं गरजेचं असून, प्लॅटफॉर्मवरच्या एखाद्या कंटेंटबद्दल तक्रार करण्याची पद्धत कशी आहे, याची माहिती युझर्सना देणं आवश्यक आहे. तक्रार मिळाल्यापासून 24 तासांच्या आत त्याची दखल घेतल्याची पावती युझर्सना देणं आवश्यक असून, त्या दिवसापासून 15 दिवसांच्या आत त्या तक्रारीवर कार्यवाही होणं बंधनकारक आहे.

First published:
top videos

    Tags: Facebook, Social media, Twitter, Whatsaap