News18 Lokmat

होय, माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे; उमेदवारांना द्यावी लागेल वृत्तपत्रात जाहिरात

निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना एक झटका दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2019 07:31 PM IST

होय, माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे; उमेदवारांना द्यावी लागेल वृत्तपत्रात जाहिरात

नवी दिल्ली, 11 मार्च: देशात लोकसभा निवडणुकीसाठीचे बिगुल वाजले आहे. सर्व पक्ष उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठका आणि चर्चा करत आहे. अशातच निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना एक झटका दिला आहे.

लोकसभा निवडणूक लढवणारा उमेदवार जर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असेल तर त्याला ती गोष्टी लपवता येणार नाही. इतक नव्हे तर संबंधित उमेदवाराला वृत्तपत्र आणि टिव्हीवर जाहिरात देऊन मी गुन्हेगार आहे आहे किंवा माझ्यावर अमूक अमूक प्रकारचे खटले सुरु आहेत ही माहिती द्यावी लागणार आहे.

विशेष म्हणजे अशा प्रकारच्या उमेदवाराला एकदा नव्हे तर 3 वेळा अशा प्रकारची जाहिरात द्यावी लागणार आहे. जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराने जाहिरात दिली नाही तर आयोगाकडून कारवाई केली जाऊ शकते.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सर्व राजकीय पक्षांना उमेदवारी देताना विचार करावा लागणार आहे. कारण केवळ उमेदवारांनाच नव्हे तर संबंधित पक्षांना देखील अशा प्रकारच्या उमेदवारांची माहिती वृत्तपत्र आणि टिव्हीवर द्यावी लागणार आहे.

काय सांगतोय नॅशनल इलेक्शन वॉच आणि एडीआरचा रिपोर्ट

Loading...

16व्या लोकसभेत प्रत्येक तिसऱ्या खासदारावर गुन्हेगारी स्वरुपाचे खटले होते. 2014मध्ये विजयी झालेल्यापैकी 186 खासदारांनी (34 टक्के) प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी स्वरुपाचे असल्याचे म्हटले होते. हीच संख्या 2009मध्ये 30 टक्के इतकी होती. दुसऱ्या एका रिपोर्टनुसार देशातली 4 हजार 856 लोकप्रतिनिधींवर गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यात हत्या, हत्येचा प्रयत्न, हिंसा, अपहरण, महिलांच्या संदर्भातील गुन्हे आदींचा समावेश आहे.

एडीएरच्या अहवालानुसार गेल्या 5 वर्षात राजकीय पक्षांनी महिलांसंदर्भातील गुन्हे असलेल्या 334 जणांना उमेदवारी दिली होती. यातील 40 लोकसभा तर 294 विधानसभेचे उमेदवार होते.


VIDEO : 'इंजिना'ला टाटा करून मनसेचे एकमेव आमदार शिवसेनेत दाखल
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2019 07:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...