निर्दयीपणाचा कळस! क्राईम पेट्रोल पाहून रचला आईच्या हत्येचा कट, 5 दिवस शव ठेवलं पेटीत

निर्दयीपणाचा कळस! क्राईम पेट्रोल पाहून रचला आईच्या हत्येचा कट, 5 दिवस शव ठेवलं पेटीत

रागाच्या भरात त्या मुलाने आईची हत्या केली आणि जन्मदात्या आईचं शव पाच दिवस घरात एका पेटीत भरुन ठेवलं.

  • Share this:

खंडवा, 23 फेब्रुवारी : मध्य प्रदेशातील खंडवा शहरात एका व्यक्तीने छोट्याशा कारणाने आपल्या आईची हत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पुढे तर त्याने सर्व मर्यादाच ओलांडली. ता मुलाने आईचा मृतदेह तब्बल पाच दिवस घरातील एका पेटीमध्ये ठेवला. मृतदेहाची दुर्गंधी येऊ लागल्याने त्याने तो एका गोणीत भरला आणि गुरुवारी रात्री कोतवाली ठाणे परिसरात रामनगरातील साई मंदिराजवळील नाल्यात फेकून दिला. परिसरात दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. खंडवाचे पोलीस अधिक्षक शिवदयाल सिंह यांनी शनिवारी सांगितले, विमला बाई (50) हिच्या हत्या प्रकरणात तिचा मुलगा संतोष पाटील (32) याला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. त्या रामनगर येथे राहत होत्या.

सीसीटीव्ही कॅमेरात आरोपी झाला कैद

शिवदयाल सिंह यांनी सांगितले की या हत्येचा तपास करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर मोठा खुलासा झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती पाठीवर गोणी घेऊन जात असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी याबाबत परिसरातील नागरिकांना विचारले असता हा व्यक्ती संतोष पाटील असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांना संतोषला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान आपण आईची हत्या केल्याचे संतोषने कबूल केले.

क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट

आरोपीने सांगिल्याप्रमाणे, टिव्हीवरील क्राईम पेट्रोल मालिका पाहुन त्याने आईच्या हत्येचा कट रचला. खंडवाचे पोलीस अधिक्षक शिवदयाल सिंह यांनी सांगितले की, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे विमला बाई आपल्या मुलाला पैसे कमविण्यासाठी सांगत असे. त्याला सल्ले देत होती. त्यामुळे आरोपीने रागाच्याभरात आईची हत्या केली.

First published: February 23, 2020, 8:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading