5 मे: गाडी पार्किंगच्या कारणावरून दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. जालंधर इथल्या अवतारनगर मध्ये झालेल्या या हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत हेमा सूद नावाच्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पार्क केलेली गाडी काढण्यास शेजारच्या महिलेने सांगितले. तेव्हा पती घरी नव्हता आणि गाडीच्या चावी त्याच्याकडे असल्याने गाडी काढायला वेळ होईल असं सांगितल. तेव्हा शेजारच्या महिलेनं थेट मारहाण सुरु केल्याचा आरोप हेमा सूद यांनी केला आहे.