नात्याला काळिमा! भावानं 3 मित्रांसोबत मिळून मूक-बधिर बहिणीवर केला गँगरेप

नात्याला काळिमा! भावानं 3 मित्रांसोबत मिळून मूक-बधिर बहिणीवर केला गँगरेप

Crime News : बहीण-भावाचा नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या भावानं मित्रांसोबत मिळून आपल्या मूक-बधिर बहिणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

  • Share this:

लखनौ, 6 ऑगस्ट : बहीण-भावाचा नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या भावानं मित्रांसोबत मिळून आपल्या  मूक-बधिर बहिणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मुलगा 12 वर्षांचा आणि पीडित मुलगी 8 वर्षांची आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.  उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील ही घटना आहे.

(वाचा : नगरसेवकाच्या मुलांची गुंडगिरी, तरुणाच्या डोक्यात फोडल्या बिअरच्या बाटल्या)

पीडित मुलीला रिकाम्या खोलीत नेलं आणि...

रविवारी (4 ऑगस्ट) संध्याकाळी पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती. त्यावेळेस तिच्या भावानं कसलं तरी आमिष दाखवून तिला रिकाम्या खोलीत नेलं. तेथे या नराधम भावानं त्याच्या तीन मित्रांसोबत मिळून बहिणीवर लैंगिक अत्याचार केले. पीडितेनं आरडाओरडा केला त्यावेळेस या चारही जणांनी तिचं तोंड दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न देखील केला. दरम्यान, पीडित मुलीची प्रकृती बिघडू लागल्यानं चारही जणांनी तिला तेथेच सोडलं आणि फरार झाले.

(पाहा :4 मजली इमारतीला आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू, आगीचा भीषण VIDEO)

एक महिन्यापासून सुरू होते अत्याचार

चीड आणणारी बाब म्हणजे या पीडितेवर वासनांध भाऊ आणि त्याचे मित्र गेल्या महिन्याभरापासून सामूहिक बलात्कार करत होते. पीडित मुलीच्या वडिलांना मुलाच्या दुष्कर्माबाबत माहिती मिळताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी चौघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

(वाचा : JNUच्या विद्यार्थिनीला गुंगीचं औषध देऊन टॅक्सी ड्रायव्हरचा बलात्कार)

VIDEO: तो एक क्षण आणि थोडक्यात बचावले मुख्यमंत्री!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 12:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading